मुंबई,दि.1: Jayant Patil Eknath Shinde: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना भाजपाने मुख्यमंत्री का केलं? याचे कारण सांगितले आहे. भाजपाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन आणखी एक धक्का दिला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील असे वाटत असताना भाजपाने मोठा धक्का दिला.
अखेरीस सायंकाळी साडेसात वाजता राजभवनावरील छोटेखानी समारंभात शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. याच दरम्यान राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी यावर भाष्य़ केलं आहे. भाजपाच्या या निर्णयामध्ये कुठलंही धक्कातंत्र दिसलं नाही. मात्र सत्ता मिळवण्यासाठी ज्यापद्धतीने प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे राज्यातील जनतेमध्ये रोष निर्माण झाला होता. या रोषाला शांत करण्यासाठी भाजपाने हा निर्णय घेतला असावा असं वाटत असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
“देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील असं वाटत होतं. मात्र त्यांना वरून सूचना आली. भाजपामध्ये वरून आलेल्या आदेशाचे पालन करावे लागते. देवेंद्र फडणवीस यांना देखील आपणच मुख्यमंत्री होणार असं वाटत असावं मात्र वरिष्ठांच्या आदेशापुढे त्यांचा नाईलाज झाला. त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली. याचे दु:ख त्यांनाही झाले असेलच असंही यावेळी जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. TV9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे.
संजय राऊत यांनी दिल्या शुभेच्छादेवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेंचे उजवे हात आहेत. आता दोघांनी मिळून राज्य पुढे न्यावं, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. नव्या सरकारला कोणतेही अडथळे निर्माण करणार नाही. शिंदे आणि फडणवीस यांना शुभेच्छा, असंही राऊत म्हणाले.