राजौरी,दि.2: Jammu Kashmir News: जम्मू-काश्मीरच्या (Jammu-Kashmir) राजौरीमध्ये (Rajouri) रविवारी संध्याकाळी उशिरा दहशतवाद्यांनी हिंदू कुटुंबांवर गोळीबार केला. ज्यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला. यासोबतच 10 जण जखमी झाले आहेत. माहिती मिळताच सुरक्षा दलाच्या जवानांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्याचबरोबर संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून दहशतवाद्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी राजौरीतील धनगरी भागात हा गोळीबार केला आहे.
आधार कार्ड पाहून हल्ला | Jammu Kashmir News
आधार कार्ड पाहिल्यानंतर दहशतवाद्यांनी येथील तीन घरांना लक्ष्य केल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. प्रीतम शर्मा, त्यांचा मुलगा आशिष कुमार, दीपक कुमार आणि शीतल कुमार अशी या हल्ल्यात ठार झालेल्यांची नावे आहेत.

दहशतवादी हल्ल्यात 4 जणांचा मृत्यू | Jammu Kashmir News In Marathi
पोलिसांनी सांगितले की, सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास डांगरी येथील उच्च माध्यमिक विद्यालयाजवळ गोळीबाराची घटना घडली. ज्यात एक महिला आणि एका मुलासह हिंदू कुटुंबातील 10 जण जखमी झाले. नंतर सतीशसह 4 जणांचा मृत्यू झाला, तर इतरांवर जीएमसी राजौरी येथे उपचार सुरू आहेत. सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले आहे. घटना अप्पर डांगरी गावातील आहे. सुमारे 50 मीटर अंतरावरील तीन वेगवेगळ्या घरांमध्ये गोळीबार करण्यात आला. परिसरात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.
हेही वाचा Operation Lotus: भाजपच्या नेत्याचा दावा, महाराष्ट्रानंतर आणखी एका राज्यात होणार सत्तांतर?

डॉ. मेहमूद यांनी सांगितले की… | Jammu Kashmir News Today
राजौरी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मेहमूद यांनी सांगितले की, राजौरीतील डांगरी भागात झालेल्या गोळीबारात 3 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत. पोलीस आणि जिल्हा प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. जखमींच्या शरीरावर गोळ्यांच्या अनेक खुणा आढळून आल्या आहेत.
कुपवाडा येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त
दहशतवादविरोधी कारवाई विरोधातील मोहिमेत मोठे यश आले आहे. कुपवाडा पोलिसांनी जिल्ह्यातील कर्नाह भागातून एका व्यक्तीला अटक केली आणि शस्त्रे, दारूगोळा आणि अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला. जिल्हा पोलीस कुपवाडा यांना मिळालेल्या एका विशिष्ट माहितीच्या आधारे, कर्नाह पोलीस स्टेशनच्या चातकरी परिसरात दोन व्यक्तींनी शस्त्र, दारूगोळा आणि अंमली पदार्थांची तस्करी केली आहे. एसएचओ कर्नाह यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने संयुक्त शोध मोहीम राबवली. झडतीदरम्यान उमर अजीजचा मुलगा अजीज-उ-रेहमान कुमार रा. चातकडी याला अटक करण्यात आली. सतत चौकशी केल्यावर, उमरने त्याच्या आणि त्याच्या इतर साथीदारांकडून शस्त्रे, दारूगोळा आणि अंमली पदार्थांची खेप मिळाल्याची कबुली दिली. पोलिसांनी पाच पिस्तूल, 10 पिस्तुल मॅगझिन, 77 पिस्तुल राऊंड, एक पिस्तुल क्लिनिंग रॉड, एक पिस्तूल वापरकर्ता मॅन्युअल गाईड, चार हातबॉम्ब आणि 9.450 किलो वजनाचे हेरॉईन जप्त केले.
2022 मध्ये 172 दहशतवादी मारले गेले
2022 च्या शेवटच्या दिवशी, एडीजीपी काश्मीर विजय कुमार यांनी माहिती दिली की गेल्या वर्षभरात काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये एकूण 93 यशस्वी चकमकी झाल्या. ज्यामध्ये 42 परदेशी दहशतवाद्यांसह 172 दहशतवादी मारले गेले. मारले गेलेले सर्वाधिक दहशतवादी (108) एलईटी/टीआरएफ संघटनेचे होते, त्यानंतर जेईएम (35), एचएम (22), अल-बद्र (4) आणि एजीयूएच (3) होते.