Jamaat Ulama e Hind: जमात उलामा-ए-हिंदने नुपूर शर्मा आणि हिंसाचाराच्या घटनेवर केलं मोठं वक्तव्य

0

नवी दिल्ली,दि.12: जमात उलामा-ए-हिंदने (Jamaat Ulama e Hind) नुपूर शर्मा आणि हिंसाचाराच्या घटनेवर मोठं वक्तव्य केलं आहे. प्रशोभक वक्तव्य करणाऱ्यावर जमात उलामा हिंदने टीका केली आहे. प्रेषित मोहम्मद (Prophet Mohammad) यांच्यावर नुपूर शर्माच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर देशभरात निदर्शने आणि हिंसाचाराच्या घटनांवर जमात उलेमा ए हिंदने प्रतिक्रिया दिली आहे. जमात उलामा-ए-हिंदचे (Jamaat Ulama e Hind) अध्यक्ष मौलाना सुहैब कासमी म्हणाले की, प्रेषित मुहम्मद यांच्यावर कथितपणे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या माजी नेत्या नुपूर शर्मा यांना इस्लामनुसार माफी देण्यात यावी. ते म्हणाले की मुस्लिम विद्वानांच्या संघटनेने त्यांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी निषेधाशी असहमत आहे.

याशिवाय जमात उलेमा-ए-हिंदनेही शर्मा यांना निलंबित करण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या (BJP) निर्णयाचे स्वागत केले आहे. “आम्ही कायद्याच्या निर्णयाचे स्वागत करत आहोत. कारण भारत देशा कायद्याचे पालन करणारा आहे आणि आम्ही कायदा हातात घेणार नाही. कायदा रस्त्यावर येऊन नियम मोडण्याची परवानगी देत नाही,” असे कासमी पत्रकार परिषदेत म्हणाले.

शुक्रवारच्या नमाजानंतर शर्मा यांच्या वक्तव्याचा देशभरात निषेध करण्यासाठी झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जमात उलेमा-ए-हिंदने आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. सुहैब कासमी म्हणाले की, देशातील बहुतांश मुस्लिम संघटना फक्त 20 कोटी मुस्लिमांबद्दल बोलतात, मात्र कुणीच 135 कोटी भारतीयांबद्दल बोलत नाहीत. 10 जून रोजी संपूर्ण देशात एकाच प्रकारचे धरणे आंदोलन सुरू झाले. कुठल्यातरी अजेंड्याखाली दंगल झाली. मदनी, असदुद्दीन ओवेसी सारखे लोकांचे अश्रू मगरीचे अश्रू सारखे आहेत. दंगली नंतर सर्व गायब झाले आहेत. असदुद्दीन ओवेसी कुठल्याही निदर्शनात नव्हते. मात्र यांनी तरुण मुलांना दंगा करायला सोडले आहे.

जमात उलेमा-ए-हिंदने एक ‘फतवा’ जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याद्वारे तो लोकांना नुपूर शर्मा आणि तिच्या वक्तव्यासंदर्भात कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराचे समर्थन करू नये असे आवाहन केले जाईल. हा फतवा असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) आणि मोहम्मद मदनी (Mohammad Madani) यांच्या विरोधात काढण्यात येईल, असे जमातने म्हटले आहे.

जमात उलामा-ए-हिंदने अनेक मुस्लिम संघटना आणि त्यांच्या निधीची चौकशी करण्याचे आवाहनही सरकारला केले आणि ते म्हणाले की ते इतर मुस्लिम संघटनांना हिंसाचार भडकावू देणार नाहीत.

सुहैब कासमी म्हणाले की, कोणत्याही मोठ्या संघटनेने या आंदोलनांचे नेतृत्व केले नाही, सामान्य मुस्लिमांना मरण्यासाठी सोडून देण्यात आले. आम्ही कोणत्याही हिंसाचाराच्या बाजूने नाही. हिंसा किती मोठा गुन्हा आहे हे इस्लाममध्ये लिहिले आहे.

अन्याय करणारे हेच आहेत, दरोडेखोरही असेच आहेत, असे ते म्हणाले. येथे अन्याय होत असल्याचे अरब देशांना सांगितले जाते. अशा लोकांना आम्ही भविष्यात विरोध करू. देशाच्या आत आणि बाहेरील शक्ती देशाविरुद्ध एकत्र काम करत आहेत. ही आपल्या देशाची अंतर्गत बाब आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here