जैन मुनींनी घेतला मोठा निर्णय, राज्य सरकारला दिला इशारा

0
जैन मुनींनी घेतला मोठा निर्णय, राज्य सरकारला दिला इशारा

मुंबई,दि.१२: जैन मुनींने राज्य सरकारला इशारा दिला आहे. जैन मुनी आणि जैन धर्माचे पालन करणारे पशू पक्ष्यांना वाचवण्यासाठी प्रयत्नशील असतात. गाय तसेच इतर प्राण्यांची सेवा करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येते. मुंबईतील कबूतरखाना बंद केल्यानंतर जैन समाज मोठ्या प्रमाणात नाराज झाला आहे. कबूतरखाना बंद करण्यास जैन समाजाने विरोध दर्शवला होता. कांद्यामुळे जसे काँग्रेस सरकार गेले तसेच कबुतरांमुळे महायुतीचे सरकार जाईल, असा इशारा जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांनी दिला आहे. 

जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांनी राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याचे जाहीर केले आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीला धडा शिकवण्यासाठी जैन समाजाने मोठा निर्णय घेतला आहे. “शांतीदूत जनकल्याण पक्ष” नावाचा राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा जैन मुनींनी केली आहे. या पक्षाचे चिन्ह कबूतर असणार आहे आणि निवडणूक लढवली जाणार आहे. आता कबुतरांचा मुद्दा चांगलाच गाजणार असल्याचे दिसून येत आहे. 

कबुतरे, कुत्रे, गायी सुरक्षित नाही. गणपतीचे वाहन उंदरावरही याल. विकासाच्या नावाखाली झाडे तोडून माणसांनी घरे बांधली म्हणून कबुतरे बेघर झाली. आम्ही गोमातेसह इतर प्राण्यांसाठीही काम करू. महाराष्ट्राचा मराठी माणूस कबुतरांना विरोध करत नाही. मात्र, ज्यांना राजकारण करायचे आहे त्यांनी कबुतरांचा प्रश्न निर्माण केला. आमचा धर्म आम्ही विसरणार नाही, असे मुनी विजय म्हणाले.

काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोणी काय विधान केले हे मी पाहिले नाही. साधारणपणे सगळे जैन मुनी अतिशय त्यागाने जीवन जगत असतात. सगळ्यांना जगण्याचा ते उत्तम मार्ग सांगतात. अहिंसेचा मार्ग सांगतात. अपरिग्रह हे जे अत्यंत महत्त्वाचे मूल्य आहे, ते शिकवण्याचे काम आमचे जैन मुनी करत असतात. त्यांच्याबाबत नितांत आदर आम्हाला आहे. जैन मुनी जो चांगला मार्ग सांगतील, त्या मार्गावर चालण्याचा आम्ही प्रयत्न करू. बाकी कोण काय बोलले असतील, तर मला त्याची माहिती नाही. त्यामुळे मी त्यावर बोलू शकणार नाही, असे त्यांनी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here