Hasan Mushrif: राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफांच्या घरी पुन्हा ईडीचा छापा

0

कोल्हापूर,दि.११: IT raids Hasan Mushrif’s home: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या कागल येथील निवासस्थानी आज पुन्हा एकदा ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. गेल्या दीड महिन्यात दुसऱ्यांदा ही कारवाई करण्यात आली. हसन मुश्रीफ यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज पहाटेच्या सुमारास ईडीचे चार ते पाच अधिकारी कागल येथील हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यांनी छापा टाकत कागदपत्राची तपासणी सुरू केली. यामुळे सध्या एकच खळबळ उडाली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पहाटे पडली धाड | IT raids Hasan Mushrif’s home

माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मागे इडी ससेमिरा लागला आहे. आज पुन्हा पहाटेच्या सुमारास ईडीचे चार ते पाच अधिकारी हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी येत तपासणी सुरू केली आहे. गेल्या दीड महिन्यात हसन मुश्रीफ यांच्या घरावरील दुसरी धाड पडली असून हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत देखील यापूर्वी ईडीने छापा टाकत काही महत्त्वपूर्ण कागदपत्र ताब्यात घेतली होती. यानंतर अवघ्या काही दिवसातच आज पुन्हा कागल येथील घरावर पुन्हा एकदा ईडीची धाड पडल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर यामुळे हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं ही सांगितलं जात आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सकाळी सकाळीच मुश्रीफ यांच्या घरी येऊन छाननी सुरू केली असून या कारवाईत कोणताही हस्तक्षेप होऊ नये म्हणून मुश्रीफ यांच्या घराबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? | Hasan Mushrif

संताजी घोरपडे साखर कारखान्यातील घोटाळ्याप्रकरणी मुश्रीफ यांच्या घरावर धाड पडली आहे. कोलकात्यातील बोगसकंपन्यांमधून 158 कोटी रुपये या कारखान्यात ट्रान्स्फर झाले होते. हा पैसा आला कुठून? ही कंपनी आहे कुठे? हा मनी लॉन्ड्रिंगचा पैसा आहे, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली होती. तसेच या प्रकरणी मुश्रीफ यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही सोमय्या यांनी केली होती. त्यानंतर आयकर विभाग आणि ईडीने मुश्रीफ यांच्याविरोधात कारवाईस सुरुवात केली होती. पहिल्या धाडीनंतर अवघ्या पंधरा दिवसात हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत देखील ईडीचं पथक तब्बल दोन दिवस कागदपत्राची तपासणी करत होते. बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह पाच जणांना इडीने ताब्यात घेतले होते. या चौकशीतून समोर काय आले हे अद्याप कळू शकले नसले तरी दोन दिवसांपूर्वीच जिल्हा बँकेचे लेखा परीक्षण करण्याचे आदेश ही देण्यात आले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here