तुमच्या बँक खात्यात LPG Cylinder सबसिडी जमा होतेय का?

0

दि.5 : LPG cylinder च्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. गॅस सिलेंडरवर मिळणारी सबसिडी ग्राहकांच्या बँक खात्यात जमा केली जाते. गॅस वाढणाऱ्या किंमतीमुळे सामान्यांचे बजेट कोलमडते. गॅसवर मिळणारी सबसिडी ही ग्राहकांच्या बँक खात्यात जमा केली जाते. मात्र ग्राहकांना सबसिडी मिळते का नाही? मिळत असेल तर बँकेत जमा होते का नाही? हे कळणे महत्वाचे आहे.

गॅस सिलिंडरच्या सबसिडीचे (subsidy) पैसे थेट ग्राहकांच्या खात्यावर जमा केले जातात; मात्र याआधी तुम्हाला सबसिडी मिळवण्याचा हक्क आहे की नाही हे पाहावं लागेल. तुम्ही एलपीजी सबसिडी मिळवण्यास पात्र असाल, तर तुम्हाला सबसिडी मिळत आहे की नाही ते तपासा. तुमच्या बँक खात्यात पैसे येत आहेत की नाही हे ही बघा. जर पैसे येत नसतील, तर तुम्ही तुमच्या बँक खात्याला आधार क्रमांक तत्काळ जोडणं आवश्यक आहे. आधार लिंक केल्यानंतर पैसे थेट तुमच्या खात्यात येऊ लागतील.

सबसिडी मिळते की नाही असं तपासा

  • सर्वप्रथम तुम्हाला www.mylpg.in या वेबसाइटवर जावं लागेल.
  • यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला तीन कंपन्यांच्या गॅस सिलिंडरचा फोटो दिसेल.
  • तिथे तुम्ही तुमच्या डिस्ट्रिब्युटरसह गॅस सिलिंडरच्या फोटोवर क्लिक करा.
  • यानंतर एक नवीन विंडो उघडेल. त्यात तुमच्या डिस्ट्रिब्युटरची माहिती असेल.
  • वर उजवीकडे साइन-इन आणि नवीन युझर्सचा पर्याय असेल तो निवडा.
  • यानंतर तुमचा आयडी बनवला असेल तर इथं साइन इन करा. अन्यथा तुम्हाला न्यू युझर हा पर्याय निवडावा लागेल.
  • त्यानंतर आणखी एक नवीन विंडो ओपन होईल, ज्यात View Cylinder Booking History चा पर्याय उजव्या बाजूला असेल, तो निवडा.
  • तुम्हाला सबसिडी मिळत आहे की नाही हे कळेल. तुम्हाला सबसिडी मिळत नसेल तर तुम्ही 18002333555 टोल फ्री क्रमांकावर तक्रार करू शकता.

सबसिडी न मिळण्याचं मुख्य कारण म्हणजे एलपीजी आयडी बँक खाते क्रमांकाशी जोडलेला नसणं. यासाठी ग्राहक आपल्या जवळच्या डिस्ट्रिब्युटरशी संपर्क साधू शकतात आणि त्याला आपल्या समस्येबद्दल सांगू शकतात. तसंच 18002333555 या टोल फ्री नंबरवर कॉल करून ग्राहक आपली तक्रार दाखल करू शकतात.

एलपीजीची सबसिडी वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी आहे. ज्यांचं वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये किंवा त्याहून अधिक आहे त्यांना सबसिडी मिळणार नाही. 10 लाख रुपयांच्या ह्या वार्षिक उत्पन्नात पती-पत्नी अशा दोघांच्या उत्पन्नाचा समावेश आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here