IRCTC ने बदलले रेल्वे प्रवाशांसाठी ॲानलाईन तिकीट बुकिंगचे नियम

0

दि.11: रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. अनेक प्रवाशी रेल्वेचे तिकीट ॲानलाईन काढतात. ॲानलाईन तिकीट काढल्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचतो. भारतीय रेल्वे उपक्रमाच्या IRCTC च्या संकेतस्थळावरुन रेल्वेचं तिकीट बुक करण्याच्या प्रक्रियेमध्ये आता मोठा बदल करण्यात आला आहे. नव्या नियमानुसार प्रवाशांना आता तिकीट बुक करण्याआधी आपला मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी व्हेरिफाय करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी व्हेरिफिकेशनविना कोणत्याही रेल्वे गाडीचं ऑनलाइन तिकीट बुक करता येणार नाही. IRCTC च्या म्हणण्यानुसार नवे नियम हे त्याच युझर्सला लागू होतील ज्यांनी कोरोना व्हायरस महामारीच्या सुरुवातीनंतर एकदाही रेल्वे तिकीट बुकिंग केलेलं नाही.

कसा व्हेरिफाय कराल मोबाइल आणि ई-मेल आयडी IRCTC च्या वेबसाइट किंवा ॲपवर गेल्यानंतर व्हेरिफिकेशन विंडोवर क्लिक करा. व्हेरिफिकेशन विंडोवर आल्यानंतर तिथं आपला रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी रजिस्टर करा.

स्क्रीनवर उजव्याबाजूला व्हेरिफिकेशनचा पर्याय दिसून येईल तर डावीकडे एडिटचा पर्याय उपलब्ध असेल. जर तुम्हाला तुमच्या माहितीत कोणताही बदल करायचा असेल किंवा माहिती अपडेट करायची असेल तर एडिट पर्यायाच्या माध्यमातून तसं करू शकता. कोणताही बदल करायचा नसल्यास व्हेरिफिकेशनवर जाऊ शकता.

व्हेरिफिकेशनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला रजिस्टर्ड नंबरवर एक OTP येईल. याचा वापर करुन तुम्ही मोबाइल नंबर व्हेरिफाय करू शकता. याच पद्धतीनं ई-मेल आयडी देखील व्हेरिफाय करू शकता. तुमच्या रजिस्टर्ड ई-मेल आयडीवर एक कोड येईल. ज्याचा वापर करुन तुम्ही तुमचा ई-मेल आयडी व्हेरिफाय करू शकता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here