मुंबई,दि.19: IPL Auction 2024: आयपीएल २०२४ साठी आज दुबईत खेळाडूंचा लिलाव पार पडत आहे. लिलावाच्या रिंगणात एकूण ३३३ खेळाडू असून जास्तीत जास्त ७७ खेळाडूंना संधी मिळणार आहे. लिलावासाठी सर्व १० फ्रँचायझींच्या खात्यात एकूण २६२.९५ कोटी रुपये आहेत आणि या पर्समधून जास्तीत जास्त ७७ खेळाडूंवर बोली लागेल. गुजरात टायटन्सच्या फ्रँचायझीकडे सर्वाधिक ३८.१५ कोटी रुपये आहेत. तर, लखनौ सुपर जायंट्सकडे सर्वात कमी १३.१५ कोटी रुपये आहेत. आयपीएल २०२४ च्या लिलावापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सकडे सर्वात कमी खेळाडू आहेत. आताच्या घडीला केकेआरकडे १२ खेळाडूंसाठी जागा रिक्त आहे. त्याचवेळी चेन्नई, लखनौ, बंगळुरू आणि हैदराबादच्या संघात ६-६ खेळाडूंसाठी जागा शिल्लक आहे.
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडे भारतीय खेळाडू
युवराज सिंग (१६ कोटी)
इशान किशन (१५.२५ कोटी)
गौतम गंभीर (१४.९० कोटी)
दीपक चहर (१४ कोटी)
दिनेश कार्तिक (१२.५० कोटी)
हर्षल पटेल (११.७५ कोटी)
मिनी लिलाव २०२३ मधील महागडे खेळाडू
मिचेल स्टार्क – कोलकाता नाईट रायडर्स (२४.७५ कोटी)
डॅरिल मिचेल – चेन्नई सुपर किंग्स (१४ कोटी)
हर्षल पटेल – पंजाब किंग्स (११.७५ कोटी)
पॅट कमिन्स – सनरायझर्स हैदराबाद (२०.५० कोटी)
ट्रॅव्हिस हेड – सनरायझर्स हैदराबाद (६.८० कोटी)
हॅरी ब्रूक – दिल्ली कॅपिटल्स (४ कोटी)
रोवमन पॉवेल – राजस्थान रॉयल्स (७.४० कोटी)
शिवम मावी ( लखनौ सुपर जायंट्स ) – ६.४० कोटी
उमेश यादव ( गुजरात टायटन्स) – ५.८० कोटी
गेराल्ड कोएत्झी ( मुंबई इंडियन्स ) – ५ कोटी
तब्बल २४.७५ कोटी
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क कोणत्या संघात जाणार याकडे क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले होते. स्टार्कसाठी दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात मोठी चुरस झाली. यॉर्कर किंगला आपल्या संघाचा भाग बनवण्यासाठी दोन्हीही फ्रँचायझींनी मोठी रक्कम मोजण्याची तयारी दाखवली. दिल्लीने माघार घेतल्यानंतर केकेआरने यात उडी घेतली. मग गुजरात टायटन्सने देखील स्टार्कला खरेदी करण्यासाठी रस दाखवला. केकेआर आणि गुजरातच्या फ्रँचायझीने मोठी रक्कम मोजण्याची तयारी कायम ठेवली अन् १४ कोटींवर बोली गेली तरी स्टार्क लिलावाच्या रिंगणात कायम राहिला. आकडा २० कोटीवर गेला तरी बोली चालू होती. केकेआरने अखेर तब्बल २४.७५ कोटीत स्टार्कला आपल्या संघाचा भाग बनवले. यासह स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.