IPL 2023 Schedule: IPLचे वेळापत्रक जाहीर, पहिली लढत या दोन संघात; नियमात बदल

0

मुंबई,दि.१७: IPL 2023 Schedule: IPL चे वेळापत्रक जाहीर केले आहे. आयपीएल २०२३ची सुरुवात ३१ मार्च रोजी होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने आयपीएलचे वेळापत्रक जाहीर केले आहे. २०२३च्या हंगामातील पहिली लढत विद्यमान विजेते गुजरात टायटन्स आणि चार वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. ही लढत अहमदाबाद येथे होतील. पहिल्या मॅचची सुरुवात भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता होईल. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच १ एप्रिल रोजी डबल हेडर खेळवली जाईल. यातील पहिली मॅच पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात तर दुसरी लढत लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होईल.

Impact Player नियमात बदल | IPL 2023 Schedule

कर्णधाराला ११ ऐवजी १२ खेळाडूंची निवड करावी लागेल आणि त्यातील  इम्पॅक्ट प्लेअर कर्णधार निवडेल

डावाच्या सुरुवातीला इम्पॅक्ट प्लेअर जाहीर करावा लागेल किंवा एक षटक संपल्यानंतर किंवा फलंदाज रिटायर्ड हर्ट / बाद झाल्यानंतर  

गोलंदाजी करणारा संघ विकेट पडल्यानंतर षटकाच्या मध्येच इम्पॅक्ट प्लेअर खेळवू शकतो, परंतु त्याला ते षटक पूर्ण करण्यासाठी गोलंदाजी मिळू शकत नाही. 

ज्या खेळाडूच्या जागी इम्पॅक्ट प्लेअर मैदानावर उतरेल, त्या खेळाडूला नंतर संपूर्ण सामन्यात खेळता येणार नाही

किंवा राखीव खेळाडू म्हणूनही मैदानावर उतरता येणार नाही.

इम्पॅक्ट प्लेअर हा कर्णधारासारखा वागू शकत नाही, इम्पॅक्ट प्लेअर जर जखमी झाला किंवा अचानक आजारी पडला तर राखीव खेळाडू मैदानावर उतरू शकतो. पण, अम्पायरला त्याची खात्री पटली तरच…  हा राखीव खेळाडू गोलंदाजी किंवा फलंदाजी करू शकत नाही.  

इम्पॅक्ट प्लेअर संपूर्ण ४ षटकं टाकू शकतो. संघाला प्लेइंग इलेव्हनसह ४ राखीव खेळाडूंची नावं जाहीर करावी लागतील आणि यापैकी १ खेळाडूच इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानावर उतरू शकतो.

दोन्ही संघ इम्पॅक्ट प्लेअर नियमाचा वापर करू शकतात, परंतु तसे करायलाच हवं अशी सक्ती नाही. 

गुवाहाटी आणि धर्मशाला या दोन नव्या शहरांमध्ये यंदाच्या आयपीएलचे सामने खेळवले जाणार आहेत. एकूण १२ स्टेडियमवर साखळी फेरीतील ७० सामने खेळवले जातील. १८ डबल हेडर सामने असतील. प्रत्येक संघ घरच्या मैदानावर ७ आणि प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर ७ सामने खेळतील. 

IPL 2023चे पहिले पाच सामना वेळापत्रक

३१ मार्च – चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स
१ एप्रिल – पंजाब किंग्स वि. कोलकाता नाइट रायडर्स
१ एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स वि. दिल्ली कॅपिटल्स
२ एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद वि.  राजस्थान रॉयल्स
२ एप्रिल- मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 

दोन गटांत विभागणी

ग्रुप ए – मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स

ग्रुप बी – चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद, पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here