iPhone SE 3 मार्चमध्ये होणार लॉन्च, कमी किंमतीत मिळणार 5G

0

दि.6: Apple लवकरच iPhone SE 3 लॉन्च करू शकते. कंपनी पुढील महिन्यात म्हणजेच मार्चमध्ये यशस्वी ठरलेला iPhone SE 2020 लॉन्च करू शकते. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, 5G सपोर्ट असलेला या फोन 8 मार्चला Apple इव्हेंटमध्ये लॉन्च (iPhone SE 3 Launch Date) केला जाईल.

या फोनसोबतच कंपनी नवीन iPad (आयपॅड) लाँच करण्याच्या तयारीत आहे. ब्लूमबर्गने या प्रकरणाशी संबंधित लोकांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. रिपोर्ट्सनुसार, नवीन iPhone SE मध्ये 5G सपोर्ट उपलब्ध असेल. यासोबतच कंपनी यामध्ये चांगला कॅमेरा आणि वेगवान प्रोसेसर देऊ शकते.

हेही वाचा Bank Recruitment 2022: बँकेत 500 पदांसाठी भरती, जाणून घ्या किती मिळणार पगार

लाँचची तारीख बदलू शकते

Apple ने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दोन नवीन MacBook Pro मॉडेल लॉन्च केले होते, जे कंपनीच्या इन-हाउस प्रोसेसरसह येतात. रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की लॉन्च इव्हेंट फक्त एक महिन्यानंतर आहे, Apple उत्पादनास विलंब आणि इतर कारणांमुळे त्यात बदल देखील करू शकते.

हेही वाचा Kirit Somaiya: भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांकडून धक्काबुक्की

मात्र, ॲपलने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. अलीकडील अहवालानुसार, Apple ने चाचणीसाठी तीन नवीन iPhone मॉडेल A2595, A2783 आणि A2784 आयात केले आहेत. यासह, ब्रँडने दोन आयपॅड मॉडेल्स – A2588 आणि A2589 देखील आयात केले आहेत.

किंमत आणि वैशिष्ट्ये काय असतील

या वर्षी होणाऱ्या Spring इव्हेंटमध्ये कंपनी ही उत्पादने लाँच करू शकते. लीक झालेल्या अहवालांनुसार, iPhone SE 3 ची किंमत $300 (अंदाजे रु. 22,500) असेल, तर iPad ची किंमत $500 (अंदाजे रु. 37,400) ते $700 (अंदाजे रु. 52,400) असेल.

iPhone SE 3 मध्ये, कंपनी iPhone SE 2020 प्रमाणेच डिझाइन देईल, परंतु हा फोन 5G कनेक्टिव्हिटीसह येईल. यामध्ये A15 बायोनिक चिपसेट आणि 3GB रॅम मिळू शकते. मात्र, ॲपलने अद्याप या स्मार्टफोनबाबत कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here