इस्रायली सैनिकाचा जीव iPhone मुळे वाचला, पंतप्रधानांनी केला नवीन आयफोन गिफ्ट

0

मुंबई,दि.२१: Apple iPhone महाग असतात. Android फोन अनेकजण वापरतात. महाग असुनही आयफोन वापरणाऱेही अनेकजण आहेत. महागड्या स्मार्टफोन्समध्ये Apple iPhone ची गणना केली जाते. आयफोनमध्ये असे अनेक फीचर्स आहेत, ज्यामुळे या फोनची किंमत जास्त आहे. धूळ आणि वॉटरप्रुफ असण्यासोबतच iPhone अत्यंत गरम किंवा थंड तापमानातही काम करू शकतो. यातच आता हा फोन बुलेटप्रूफ असल्याचे सिद्ध झाले आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण, या iPhone मुळे एका इस्रायली सैनिकाचे प्राण वाचवले आहेत.

iPhone मुळे एका जवानाच्या शरीरात गोळी जाण्यापासून रोखली गेली आहे. यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी त्या सैनिकाची भेट घेऊन त्याला नवीन आयफोन दिला. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला जातोय. विशेष म्हणजे, आयफोनने एखाद्याचा जीव वाचवण्याची ही पहिलीच वेळ नाही.

यापूर्वीही असे घडले आहे

बेंजामिन नेतन्याहू यांचा एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर व्हायरल होतोय, ज्यामध्ये ते सैनिकाला भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचल्याचे दिसत आहेत. यावेळी त्यांनी गोळी लागलेल्या आयफोनची पाहणी केली आणि त्यानंतर सैनिकाला नवीन आयफोनही दिला. आयफोनमुळे त्या जवानाला कोणतीही इजा झाली नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here