iPhone खरेदीसाठी अ‍ॅपल स्टोअरच्या बाहेर तुफान हाणामारी

0
iPhone Craze In India | फोटोः PTI

सोलापूर,दि.१९: iPhone Craze In India | iPhone मोबाईलची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. भारतात आयफोन खरेदी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच नुकताच iPhone 17 लॅाच झाला आहे. ९ सप्टेंबर रोजी लाँच झालेल्या आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू झाली. नवीन सिरीजचा आनंद साजरा करण्यासाठी लोक काल रात्रीपासून अ‍ॅपल स्टोअर्सबाहेर जमू लागले. नवीन आयफोन मालिकेबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे.

iPhone 17 खरेदीसाठी हाणामारी | iPhone Craze In India

दरम्यान, नवीन आयफोन खरेदी करण्यासाठी वाट पाहणाऱ्या लोकांमध्ये हाणामारी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. मुंबईतील बीकेसी येथील अ‍ॅपल स्टोअरबाहेर आयफोन खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. दरम्यान, काही लोकांमध्ये हाणामारी झाली. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल म्हणजेच ब्रांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि सोलापूरमध्येही आयफोन खरेदीसाठी गर्दी झाली आहे. 

मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल म्हणजेच ब्रांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आयफोन चाहत्यांनी सूर्योदयाच्या आधापासूनच रांगा लागल्या आहेत. या रागांमध्ये शेकडोच्या संख्येनं आयफोन चाहते उभे असून कधी आपल्याला आयफोन घेण्याची संधी मिळेल याची वाट पाहत अनेक तास ताटकळत उभे आहेत.

सोशल मीडियावर फिरणाऱ्या व्हिडिओंमध्ये अ‍ॅपल स्टोअरच्या बाहेर गर्दीतील काही लोक एकमेकांशी भांडण करताना दिसत आहेत. यानंतर हाणामारी सुरू झाली. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केला. सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतही काही तरुण हाणामारी करताना दिसले. बऱ्याच प्रयत्नांनंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांना हाणामारीवर नियंत्रण मिळवता आले. मुंबईप्रमाणेच दिल्लीतील अ‍ॅपल स्टोअरच्या बाहेरही एक लांब रांग लागली होती. नवीन आयफोन खरेदी करण्यासाठी लोक काल रात्रीपासूनच रांगेत उभे होते. 

पितृपक्षातही खूप खरेदी

हिंदू धर्मात पितृपक्ष चालू आहे, जो पूर्वजांच्या मुक्ती आणि श्राद्ध विधींशी संबंधित आहे. धार्मिक श्रद्धेनुसार, या काळात नवीन वस्तू खरेदी करणे टाळावे. तथापि, परंपरा आणि श्रद्धांना तोडून, नवीन आयफोन १७ मालिकेसाठी तरुणांमध्ये प्रचंड उत्साह होता.

मुस्लिम तरुण म्हणाला भगवा 

दिल्लीमध्येही अ‍ॅपल स्टोरअबाहेर लांबच लांब रांग लागल्याचं दिसत आहे. या ठिकाणी आयफोन घेणाऱ्या एका तरुणाने पीटीआयशी बोलताना, “मी सकाळपासूनच रांगेत होतो. मला हा भगव्या रंगाचा आयफोन हवाच होता. मला वाटतं हा भगव्या रंगाचा आयफोन फारच लोकप्रिय होईल. मी मुस्लिम आहे पण मला हा रंग फार आवडतो,” असं सांगितलं.

भारतातील आयफोन चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. आयफोन १७ सिरीज आणि इतर नवीन अॅपल उत्पादनांची विक्री आज, १९ सप्टेंबर रोजी भारतात सुरू झाली. या फोनची क्रेझ इतकी तीव्र आहे की हाणामाऱ्या होत आहेत. मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील अॅपल स्टोअरमध्ये पहिल्याच दिवशी आयफोन १७ सिरीज खरेदी करण्यासाठी शेकडो ग्राहकांनी गर्दी केली होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here