Omicron Variant: इन्साकॉगची या वयोगटातील नागरिकांना लसीचा बूस्टर डोस देण्याची केंद्र सरकारला शिफारस

0

Omicron Variant: भारतात ओमिक्रॉन (Omicron) रुग्ण आढल्यानंतर चिंता व्यक्त केली जात आहे. नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉन जास्त घातक असल्याचे अजून जरी सिद्ध झाले नसले तरी याचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. देशभरातील प्रयोगशाळांच्या इन्साकॉग नेटवर्कच्या साप्ताहिक वार्तापत्रात 40 वर्षे व त्यापुढील वयोगटाच्या व्यक्तींना बूस्टर डोस देण्याचा विचार होण्याची शक्यता आहे अशी माहिती देण्यात आली आहे. अशा बूस्टर डोससंदर्भातील शिफारस इन्साकॉगने केंद्र सरकारला केली आहे.

देशात लसीकरण सुरू आहे. अजूनही काही नागरिकांनी लस घेतली नाही. ज्यांनी आजवर लस घेतलेली नाही, त्यांना ओमिक्राॅनच्या संसर्गाचा धोका आहे याची जाणीवही इन्साकॉगने करून दिली आहे. या संस्थेने म्हटले आहे की, सध्याच्या लसींमुळे शरीरात निर्माण होणाऱ्या अँटीबॉडीज् या नव्या विषाणूला निष्प्रभ करण्यासाठी पुरेशा ठरणार नाहीत अशी शक्यता आहे. मात्र नव्या विषाणूमुळे होणाऱ्या संसर्गाची तीव्रता मात्र पूर्वीच्या विषाणूंच्या तुलनेत कमी असू शकेल.

40 वर्षे व त्यावरील वयोगटातील नागरिकांना ओमिक्रॉनचा सर्वाधिक धोका असल्याने त्यांना बूस्टर डोस देण्यात यावेत, असे इन्साकॉगचे मत आहे. या नव्या विषाणूचे अस्तित्व लवकर शोधून काढण्यासाठी जिनोमिक सिक्वेंसिंग अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी तातडीने पावले उचलणे शक्य होईल. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here