उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबाबत सूचक संकेत

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वक्तव्य केलं होतं

0

पुणे,दि.२९: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबाबत सूचक संकेत दिले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे. छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही पत्रकार परिषदेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती.

खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष कायम आहे. त्यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहोचविण्यात आल्या आहेत, असे सांगत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदमुक्त करण्याचे सूचक संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिले.

राज्यातील महापुरुषांबाबत सातत्याने वादग्रस्त विधान करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदमुक्त करण्यासाठी विरोधी पक्ष एकवटले आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांनीही पुण्यात सोमवारी राज्यपालांविरोधात नाराजी व्यक्त करत राज्यपालांवर कारवाई करण्याची आग्रही मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर पुण्यात एका कार्यक्रमासाठी आलेले देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना पदमुक्त करण्याचे सूचक संकेत दिले.

खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष कायम आहे. छत्रपती घराण्याचे वंशज कधीच हतबल होऊ शकत नाहीत. त्यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहचल्या आहेत. राज्यपाल हे संविधानिक पद आहे. यात सरकार काही हस्तक्षेप करू शकत नाही. राज्यपालांना पदमुक्त करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here