Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर भारतीय कंपन्यांनी…

0

सोलापूर,दि.१: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतावर (India) २५ टक्के कर लादण्याचा निर्णय घेतला. रशियाकडून भारत कच्चा तेलाची आयात करत असल्याने ट्रम्प नाराज होते. अमेरिकेच्या टॅरिफवरील दबावामुळे, भारतातील अनेक सरकारी मालकीच्या तेल शुद्धीकरण कारखान्यांनी रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी तात्पुरती थांबवली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर भारतीय रिफायनरी कंपन्यांनी घेतली माघार आहे.

यामध्ये इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि मंगलोर रिफायनरी पेट्रोकेमिकल सारख्या तेल शुद्धीकरण कंपन्या समाविष्ट आहेत .  त्यांनी सध्या रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे बंद केले आहे. त्याऐवजी, या कंपन्यांनी तेल खरेदी करण्यासाठी मध्य पूर्व आणि आफ्रिकेकडे वळले आहे.

या अहवालात सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, भारतातील या सरकारी कंपन्यांनी गेल्या आठवड्यापासून कच्चे तेल आयात केलेले नाही. अद्याप या कंपन्यांकडून आणि सरकारकडून यावर कोणताही प्रतिसाद आलेला नाही.

तथापि, रिलायन्स आणि नायरा सारख्या भारतातील खाजगी तेल शुद्धीकरण प्रकल्प अजूनही वार्षिक करारानुसार  रशियन तेल आयात करत आहेत. २०२२ पासून भारत रशियाकडून ज्या स्वस्त दराने तेल खरेदी करत होता त्यात घट झाली आहे.

रशियाकडून कच्चे तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर १०० टक्के कर लादण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली होती.  ट्रम्प यांनी ९० हून अधिक देशांवर परस्पर कर लादण्याची घोषणा केली आहे. १ ऑगस्टपासून भारतावर २५ टक्के कर लादण्यात आला आहे. रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल ट्रम्प भारतावर अतिरिक्त दंड देखील लावू शकतात.

तेल आयातीच्या बाबतीत भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा देश आहे. चीननंतर तो रशियाकडून सर्वाधिक तेल खरेदी करत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here