india: रशियाकडून भारताला स्वस्तात कच्चे तेल, अमेरिकेने भारताला दिला हा सल्ला

0

दि.16: india: निर्बंधांदरम्यान रशियाने (russia) भारताला (india) सवलतीच्या दरात कच्चे तेल देऊ केले आहे. या वृत्तावर अमेरिकेने म्हटले आहे की, हे रशियावरील अमेरिकेच्या (america) निर्बंधांचे उल्लंघन मानले जाणार नाही. त्याचबरोबर या देशानेही विचार केला पाहिजे की, या काळातील इतिहास लिहिला जाईल तेव्हा त्यांना कुठे उभे राहायचे आहे, असेही अमेरिकेने म्हटले आहे.

युक्रेनवरील हल्ल्याबाबत (russia ukraine war) अमेरिकेसह अनेक पाश्चिमात्य देशांनी रशियावर कडक निर्बंध लादले आहेत. रशियन तेल आणि वायूवरही बंदी घालण्यात आली आहे, त्यामुळे रशिया भारताला कमी किमतीत इंधन तेल देऊ करत आहे. दरम्यान, रशियाकडून तेल विकत घेतल्यास अमेरिकेच्या निर्बंधांनाही सामोरे जावे लागेल, अशी शंका भारताला होती, मात्र अमेरिकेने आता भूमिका स्पष्ट केली आहे.

युक्रेन संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे हे रशियावरील अमेरिकेच्या निर्बंधांचे उल्लंघन मानले जाणार नाही, असे अमेरिकेने म्हटले आहे. मात्र, यासोबतच अमेरिकेने भारताला एक सल्लाही दिला आहे.

व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जेन साकी (jen psaki) यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांना सांगितले की, ‘कोणत्याही देशाला आमचा संदेश आहे की आम्ही जे निर्बंध लादले आहेत त्यांचे पालन करा.”

या प्रतिक्रियावर त्यांना विचारण्यात आले की, रशियाने भारताला सवलतीच्या दरात कच्च्या तेलाची ऑफर दिल्याच्या बातम्या येत आहेत, या बातमीबाबत अमेरिका भारताला काय संदेश देऊ इच्छित आहे?

त्याला उत्तर देताना ते म्हणाले, ‘मला वाटत नाही की हे निर्बंधांचे उल्लंघन होईल. पण असाही विचार करा की या काळात इतिहासाची पुस्तके लिहिली जातील, तेव्हा कुठे उभे राहायचे आहे. रशियन नेतृत्वाला पाठिंबा देणे हे आक्रमणाचे समर्थन केल्यासारखे आहे. एक हल्ला जो स्पष्टपणे विनाशकारी असल्याचे सिद्ध होत आहे.’

रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाला भारताने पाठिंबा दिलेला नाही. भारत सातत्याने दोन्ही बाजूंना राजनैतिक संवादाद्वारे मतभेद संपवण्यास सांगत आहे. भारताने आतापर्यंत संयुक्त राष्ट्रात रशियाविरोधातील सर्व ठरावांवर मतदान करण्यापासून अंतर ठेवले आहे.

रशिया-युक्रेन युद्धाबाबत अमेरिकेने आतापर्यंत भारताची तटस्थ भूमिका समजून घेतली आहे. अमेरिकेच्या खासदारांनी म्हटले आहे की भारत आपल्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी रशियावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे आणि अशा परिस्थितीत भारताची रशियाबद्दलची भूमिका समजण्यासारखी आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here