दि.21: India: 25 मार्च रोजी पाकिस्तानच्या (Pakistan) संसदेत इम्रान खान (Imran Khan) यांच्याविरोधात अविश्वास ठराव होणार आहे. त्यांच्याच पक्षाचे अनेक खासदार त्यांच्या विरोधात असल्याने इम्रान खान (Imran Khan) या मतदानाला घाबरले आहेत. दरम्यान, त्यांनी भारताचे (India) कौतुकही केले आहे.
पाकिस्तानातील राजकीय खळबळ उडाली असताना पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी भारताचे कौतुक केले आहे. इम्रान म्हणाले की, भारत हा अमेरिकेसोबत क्वाडचा (QUAD) भाग आहे, तरीही ते रशियाकडून तेल आयात करत आहेत, हे भारताचे परराष्ट्र धोरण आहे. ते म्हणाले की मी आज भारताचे कौतुक करतो. त्यांनी नेहमीच स्वतंत्र परराष्ट्र धोरण ठेवले आहे.
इम्रान खान म्हणाले भारत आणि अमेरिका (America) यांची चांगली मैत्री आहे आणि ते स्वतःला तटस्थ म्हणवतात. एवढेच नाही तर, निर्बंध असतानाही भारत रशियाकडून (Russia) तेल मागवत आहे. कारण भारताचे परराष्ट्र धोरण जनतेच्या भल्यासाठी आहे, असेही इम्रान खान यांनी म्हटले आहे.
हेही वाचा Sharad Pawar: शरद पवारांचे The Kashmir Files चित्रपटावर मोठं विधान
पाकिस्तानचे राजकारण पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. पाकिस्तानमध्ये आजपर्यंत एकाही पंतप्रधानाने आपला कार्यकाळ पूर्ण केलेला नाही. आणि आता इम्रान खान यांना सत्तेतून बेदखल करण्याची तयारी सुरू आहे. 28 मार्च रोजी पाकिस्तानच्या संसदेत इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास ठराव होणार आहे. त्यांच्याच पक्षाचे अनेक खासदार त्यांच्या विरोधात असल्याने इम्रान या मतदानाला घाबरले आहेत.
येत्या 28 मार्च रोजी पाकिस्तानच्या संसदेत इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास ठराव होणार आहे. महत्वाचे म्हणजे, त्यांच्याच पक्षाचे अनेक खासदार त्यांच्या विरोधात असल्याने इम्रान या मतदानाला भीत आहेत. असंतुष्ट खासदार इस्लामाबाद येथील सिंध हाऊसमध्ये थांबलेले आहेत.