नवी दिल्ली,दि.3: India Covid Update: देशात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. 6 महिन्यांतील दैनंदिन प्रकरणांची ही सर्वाधिक संख्या आहे. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजविला होता. यात अनेकांचा मृत्यू झाला. अनेकांचे लसीकरण झाल्यामुळे तिसऱ्या लाटेत मृत्यूंची संख्या कमी होती. देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या (Corona) सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. जानेवारी 2022 मधील तिसऱ्या लाटेनंतर गेल्या सात दिवसांत कोरोना संक्रमणाची संख्या सर्वात वेगवान दराने वाढल्याने भारतात शनिवारी 3,800 हून अधिक नवीन कोरोनाची प्रकरणे नोंदली गेली. 6 महिन्यांतील दैनंदिन प्रकरणांची ही सर्वाधिक संख्या आहे.
हेही वाचा Raju Jha Murder: भाजपा नेते राजू झा यांची गोळ्या झाडून हत्या
देशात 18,450 हून अधिक नवीन प्रकरणांची नोंद | India Covid Update
गेल्या आठवड्यात (26 मार्च ते 1 एप्रिल) देशात 18,450 हून अधिक नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे. जी मागील आठवड्यात नोंदवलेल्या 8,781 प्रकरणांपेक्षा 2.1 पट जास्त आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, आता कोरोना प्रकरणे दुप्पट होण्याची वेळ सात दिवसांपेक्षा कमी झाली आहे. गेल्या वेळी एका आठवड्यात दररोजची संख्या दुप्पट झाली, ती तिसऱ्या लाटेदरम्यान होती. तसेच, चांगली म्हणजे, दैनंदिन प्रकरणे तुलनेने कमी राहिली आहेत आणि मृत्यूची वाढ देखील किरकोळ आहे. गेल्या सात दिवसांत 29 वरून 36 मृत्यूची नोंद झाली आहे.
गेल्या आठवड्यात कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. केरळ, गोवा आणि दिल्ली, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरयाणा व उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाच्या प्रकरणांमध्ये सर्वात मोठी वाढ दिसून आली आहे. यापैकी बहुतेक राज्यांमध्ये मागील आठवड्यातील प्रकरणे त्याआधीच्या आठवड्यापेक्षा तिप्पट आहेत. गेल्या आठवड्यात हिमाचल प्रदेशमध्ये कोरोनाचे 1200 नवे रुग्ण आढळले आहेत, तर त्याआधी आठवड्यात 409 रुग्ण आढळले होते. केरळमध्ये गेल्या आठवड्यात 4000 प्रकरणे समोर आली आहेत, तर याठिकाणी मागील आठवड्यात 1333 नवीन प्रकरणे समोर आली. येथे संसर्गाचे प्रमाण तिप्पट आहे.
महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये नवीन प्रकरणांची संख्या तुलनेने जास्त आहे. या राज्यांमध्ये काही आठवड्यांपासून व्हायरस पसरत आहे. महाराष्ट्रात स्थिरता असताना, गेल्या आठवड्यात गुजरातमध्ये कोरोनाच्या नवीन रुग्णांचा वेग कमी झाला. कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. तर तेलंगणात घट आणि आंध्र प्रदेशमध्ये कोरोनाची वाढ होताना दिसून येत आहे. याचबरोबर, गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात 3323 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर त्याआधीच्या आठवड्यात नवीन प्रकरणांची संख्या 1956 होती.
गुजरातमध्ये 2,412 नवीन प्रकरणांसह गुजरात पहिल्या तीन राज्यांमध्ये राहिले. परंतु प्रकरणांमध्ये वाढ होण्याचा दर मागील आठवड्यात 139 टक्क्यांवरून 53 टक्क्यांवर आला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये प्रकरणांमध्ये तीन पटीने वाढ झाली आहे, तर देशाची राजधानी दिल्लीत गेल्या आठवड्यात 1,733 नवीन संसर्गाची नोंद झाली आहे, जी मागील कालावधीतील 681 च्या संख्येपेक्षा 2.5 पट जास्त आहे. पंजाबमध्ये कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये 3.3 पट वाढ झाली आहे. हरयाणामध्ये 3 पट आणि उत्तर प्रदेश 2.5 पट वाढ झाली आहे. देशातील वाढत्या कोरोना प्रकरणांचा हा सलग सातवा आठवडा होता आणि गेल्या आठवड्यात सर्व प्रमुख पॅरामीटर्समध्ये वाढ झाल्याचे दिसून येते.