अशा प्रकारे फक्त 50 रुपयांपासून खरेदी करू शकता सोनं

0

दि.22: सोन्यातील गुंतवणुकीला (Investment in Gold) फार पूर्वीपासून महत्व आहे. अनेकजण गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करतात. सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत. भारतात जुन्या काळापासून सोने ही एक महत्त्वाची कमोडिटी आहे. सोन्यातील गुंतवणूक महत्त्वाची समजली जाते. मात्र, बदलत्या काळानुसार, गुंतवणुकीचे (Investment) अनेक पर्याय समोर आले असतानाही सोन्यातील गुंतवणुकीला लोकांची पसंती असते.

सोन्यात गुंतवणूक करताना सोने (फिजिकल) Physical Gold मध्ये खरेदी करावे लागत होते. आता मात्र, तुम्ही सोने खरेदी हे डिजीटल पद्धतीने खरेदी करू शकता. गोल्ड ईटीएफचा (Gold ETF) पर्याय हा सोने खरेदीसाठी चांगला आहे. गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक केल्यानंतर सोने खरेदी केल्यानंतर त्याला सुरक्षित ठेवण्याची चिंताही दूर होते. वाढत्या महागाईच्या काळात अनेकजण Gold ETF Investment ला प्राधान्य देत आहेत.

आज देशभरात धनत्रयोदशीचा उत्साह दिसून येत आहे. आजच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ समजले जाते. पारंपरीक पद्धतीने सोने खरेदी करण्याऐवजी तुम्ही Gold ETF मध्ये गुंतवणूक करू शकता. यामध्ये तुम्हाला कमी गुंतवणुकीवर अधिक परतावा मिळू शकतो.

Gold ETF

गोल्ड ईटीएफही एक म्युच्युअल फंड योजना आहे. यामध्ये तुम्ही सोनं युनिटप्रमाणे खरेदी करू शकता. तुमच्या आवश्यकतेनुसार, बाजारातील मूल्याप्रमाणे सोनं विकून मूल्य मिळवू शकता. तुमच्याकडे असलेल्या रक्कमेनुसार तुम्ही Gold ETF मध्ये गुंतवणूक करू शकता. Gold ETF खरेदीसाठी तुमच्याकडे डिमॅट अंकाउंट असणे आवश्यक आहे.

Gold ETF चे फायदे काय?

तुम्ही तुमच्या गरजेनुसार सोन्याचे युनिट खरेदी करू शकता.

तुम्ही किमान 50 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.

हे सोने खरेदी केल्यास सोने हरवण्याची किंवा ठेवण्याची चिंता नसते.

तुम्हाला सोन्या अस्सलतेबाबत चिंता बाळगण्याची गरज नाही.

हे सोने खरेदी करण्यासाठी तुम्हाला इतर कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

तुम्ही या सोन्यात 3 वर्षांहून अधिक काळ गुंतवणूक केल्यास याद्वारे मिळणारे उत्पन्न दीर्घकालीन लाभ श्रेणीमध्ये ठेवता. त्यामुळे तुम्हाला कर सवलतीतही फायदा मिळू शकतो.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here