राज्यातील या शहरात हेल्मेट नसेल तर प्रथम दंड नंतर लायसन्स रद्द

0

नाशिक,दि.१८: दुचाकीचे अनेकवेळा अपघात होतात. अपघातात डोक्याला मार लागल्याने अनेकांचा मृत्यू होतो. अनेकांना डोक्याला जबर दुखापत झाल्याने कायमचे अपंगत्व येते. रस्ते अपघातात दुचाकी चालकाला गंभीर इजा होऊ नये म्हणून हेल्मेट वापरण्याचे गरज आहे. याकरिता सरकार व स्थानिक प्रशासनाकडून हेल्मेट वापरण्याचे आवाहन करण्यात येते. सोलापूर शहरात पोलिसांनी रॅली काढून हेल्मेट बद्दल जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.

नाशिकमध्येही हेल्मेटचे महत्त्व पटवून देण्याचा पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.नाशिककरांना हेल्मेटचे महत्त्व पटवून देण्याचा पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न केला जात आहे. बहुतांश नाशिककरांकडून हेल्मेटचा नियमित वापरदेखील केला जात आहे. मात्र काही बेशिस्तांकडून अद्यापही हेल्मेटसक्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यांना वठणीवर आणण्याकरिता पोलीस आुयक्त दीपक पाण्डेय यांनी आता दंडात्मक कारवाईचा आदेश दिले आहे. बेशिस्त दुचाकीचालकांना २२ डिसेंबर रोजीच अल्टिमेटम दिला होता. हे अल्टिमेटम आता संपले आहे.

मंगळवारपासून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.पहिल्यांदा दंड तर दुसऱ्यांदा लायसन्स रद्दवाहतूक शाखेकडून नव्या सुधारित आदेशाप्रमाणे पोलिसांकडून विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या बेशिस्त दुचाकीचालकांना ५००रुपयांचा दंड केला जाणार आहे. एकदा दंड भरल्यानंतरसुद्धा दुसऱ्यांदा पुन्हा जर विनाहेल्मेट दुचाकी चालविताना पोलिसांना आढळून आल्यास १ हजार रुपयांचा दंड तर केला जाईल, मात्र त्यासोबत ३ महिन्यांकरिता लायसन्सदेखील रद्द केले जाणार आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ई-चलान पद्धतीने करण्यात आलेल्या दंडात्मक कारवाईची थकबाकी मोठी आहे. यामुळे विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांकडून ई चलानद्वारे जागेवर दंड केला जाऊन जोपर्यंत दंडाची रक्कम ऑनलाइन किंवा ऑफलाइन भरत नाही, तोपर्यंत दुचाकीचा ताबा दिला जाणार आहे.

वर्षभरात ११६ दुचाकीस्वार ठार हेल्मेटसक्ती अभियानांतर्गत १नोव्हेंबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१पर्यंत तब्बल १० हजार ५६१ दुचाकीस्वारांचे समुपदेशन करण्यात आले आहे. गेल्या वर्षभरात ११६ दुचाकी अपघातात १२४ दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी १११ दुचाकीचालकांनी हेल्मेट परिधान केलेले नव्हते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here