माजी गृहमंत्री अनिल देशमुखप्रकरणी सीबीआयने राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांना पाठवला समन्स

0

दि.1 : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखप्रकरणी (Anil Deshmukh) सीबीआयने (CBI) मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांना समन्स पाठविल्याचे सूत्रांची माहिती आहे. तसेच राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनाही समन्स पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, कुंटे, पांडे जबाब नोंदवायला हजर राहणार नाहीत, अशी माहिती आहे.

अनिल देशमुख यांना हा धक्का मानला जात आहे. मनी लाँडरिंगप्रकरणी राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना समन्स पाठवल्याची माहिती आहे. साक्षीदार म्हणून दोघांनाही हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. मात्र कुंटे आणि पांडे जबाब नोंदवण्यासाठी सीबीआय कार्यालयात हजर राहणार नाहीत. जबाब नोंदवायचा असेल तर सीबीआयने आपल्या कार्यालयात यावे असे या दोन्ही अधिकाऱ्यांनी म्हटल्याचे समजत आहे. याआधी दोन्ही अधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब नोंदवला आहे.

माहितीनुसार, अनिल देशमुख यांच्या कथित 100 कोटी वसूली प्रकरणात उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर CBIने जे एफआयआर दाखल केले आहे, यासंदर्भात पुढील चौकशीत सीताराम कुंटे आणि संजय पांडे या दोन्ही अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यासाठी CBI कडून समन्स बजावण्यात आला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here