शरद पवार निवासस्थानावर हल्ला प्रकरण, संजय राऊत यांनी केला भाजपावर गंभीर आरोप

0

मुंबई,दि.9: शरद पवार(Sharad Pawar) यांच्या निवासस्थानावर हल्ला प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Workers) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्या निवासस्थानात घुसून चप्पल फेक केली. यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील अनेक नेत्यांनी या घटनेचा निषेध केला आहे.

गुणरत्न सदावर्तेंना भाजपचा पाठिंबा आहे. विरोधी पक्षाच्या दळभद्रीपणाचा कळस आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याविरोधात गरळ ओकण्यासाठी फंडिंग केलं जात आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. कालचा हल्ला हा त्यातलाच एक भाग होता. आता जे आंदोलक रेल्वे स्टेशनवर बसले आहेत, त्यांच्याकडे सर्वांकडे एकाच वेळी प्लॅटफॉर्म तिकीट कसं काय? ही कोणती यंत्रणा आहे. कोणता राजकीय पक्ष त्यांना पोसत आहे. कामगारांच्या मागण्याबाबत आमची संवेदना आहेच मात्र एक गट भरकटवून विरोधक सरकारविरुद्ध हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं ते म्हणाले.

ज्या लोकांना पवारांनी मोठं केलं तेच पवार यांच्याविरोधात बोलत होते. बाडगे मोठ्यानं बाग देतात, तो प्रकार आम्ही काल पाहिला, असं राऊत म्हणाले. गुळगुळीत सत्ताकारण आज चालत नाही, असंही ते म्हणाले.

शरद पवारांच्या घरावर हल्ला करणारे एसटी कर्मचारी नाहीत तर हल्ल्यामागे अतृप्त आत्म्यांचा हात आहे, अशी खोचक टीका संजय यांनी दिली आहे. शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ल्यासंदर्भात संजय राऊतांनी म्हटलं की, शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ल्याला मी आंदोलन म्हणत नाही. यामागे काही राजकीय पुढाऱ्यांचा हात असू शकतो. महाराष्ट्रातील वातावरण बिघडवायचे आहे, असे काही असे अस्वस्थ आणि अतृप्त आत्मे महाराष्ट्रात आहेत व त्यांच्या माध्यमातून हे सर्व सुरू आहेत.

त्यांनी म्हटलं की, सतीश उके यांना अटक केल्यानंतर या लोकांना आनंद होतो. मुंबईतील एक वकील सदावर्ते यांना पोलिसांनी कारवाई केल्यानंतर त्रास होतो. दोघेही वकील, दोघांनाही समान न्याय पाहिजे. गेले काही दिवस भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यातील लोक कोणी विधान परिषदेत आहेत, कोणी रस्त्यावर आहेत. ते महाविकास आघाडीतील माननीय पवार साहेबांवर टीका करतात आणि आम्हाला भाषा विचारतात. तर आमची भाषा अशीच असेल असा टोला राऊतांनी लगावला आहे.

संघाच्या शाखेमध्ये याच भाषेचे वर्ग घेतात का?

संजय राऊत म्हणाले की, तुम्ही ज्या प्रमाणे शरद पवार यांच्यावर टीका टिप्पणी करत आहात. अशा प्रकारची भाषा वापरतात. म्हणजे तुमच्या संघाच्या शाखेमध्ये याच भाषेचे वर्ग घेतात का? साधनशुचिता असे शब्द वापरतात. ते कुठे गेले? असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. महाराष्ट्राला ही घाण साफ करावी लागेल आणि आता ती वेळ आली आहे. महाराष्ट्रातील राजकारणाचा स्तर नाही तर विरोधी पक्षातील काही लोकांचा स्तर खाली गेला आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here