Rashtrawadi Punha: थेट रशियात ‘राष्ट्रवादी पुन्हा’ व्हिडिओची चर्चा

0

मुंबई,दि.12: Rashtrawadi Punha: देशभरात रंगपंचमीचा जल्लोश पाहायला मिळत आहे. देशात अनेक ठिकाणी रंगपंचमीचा साजरी करताना गाण्यावर बेभान होऊन नाचत असतात. मात्र चक्क परदेशात ‘राष्ट्रवादी पुन्हा’ या गाण्यावर अनेकजण बेभान होऊन नाचत होते. याचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. रंगपंचमी, होळीचा सण देशभरात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अगदी मोठमोठ्या सेलिब्रेटींपासून ते सामान्यांपर्यंत प्रत्येकजण धुमधडाक्यात होळीचं सेलिब्रेशन करत असतो. सध्या सोशल मीडियावर होळीमध्ये गाणी लावून धमाल करतानाचे असंख्य फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये थेट रशियातील एका व्हिडिओने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

राष्ट्रवादी पुन्हा | Rashtrawadi Punha

या व्हायरल व्हिडिओ रशियामधील असून होळी साजरी करताना तरुणाई थेट राष्ट्रवादी पुन्हा गाण्यावर थिरकताना दिसत आहेत, ज्यामुळे या व्हिडिओची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. काय आहे या व्हायरल व्हिडिओमागील सत्य, चला जाणून घेवू….

भारतात होळीचा जल्लोश आणि उत्साह किती असतो हे काही वेगळे सांगायची गरज नाही. प्रत्येकासाठी होळी, धुलीवंदन, आणि रंगपंचमी हे सण धमाल करायला लावणारे असतात. भारतातला तरुण कुठेही असला तरी होळीचे सेलिब्रेशन करतोच. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओही (Viral Video) रशियामध्ये शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय तरुणांचा आहे.

वैद्यकिय शिक्षणासाठी देशातील तसेच महाराष्ट्रातील शेकडो विद्यार्थी रशियात जातात. दरम्यान शिक्षणासाठी रशियाला गेलेल्या विद्यार्थ्यांचा हा व्हिडीओ होळी सेलिब्रेशन दरम्यानचा आहे. यामध्ये डीजेच्या तालावर अनेक तरुण नाचताना दिसत आहेत. मात्र यावेळी वाजतंय ते गाणं चर्चेचा विषय ठरलं आहे. ज्ञानेश्वर अखाडे यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here