दि.22: सोशल मीडियावर (social media) अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. यातील अनेक व्हिडिओ लोकांना खूप आवडतात. प्राण्यांचे काही व्हिडिओ खूप व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत हत्तीचे (Elephant) एक जोडपं दिसत आहे. प्राण्यांनाही भावना असतात याचाच प्रत्यय या व्हिडिओतून येतो. हत्तीणीवरील प्रेम अनोख्या पद्धतीने व्यक्त करताना हत्ती दिसत आहे. (Elephant Viral Video)
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत एक हत्ती सोंडेमध्ये फुलं घेऊन आपल्या हत्तीणीला प्रपोज (Elephant Proposal Viral Video) करण्यासाठी निघालेला दिसतो. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. हत्तीचा समजूतदारपणा या व्हिडिओतून दिसून येत आहे.
प्राण्यांचा समजदारपणा आणि त्यांचं अनोख स्किल या लिस्टमध्ये व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमधील (Wildlife Videos) हा सुंदर व्हिडिओ सर्वांचंच मन जिंकत आहे. व्हिडिओ पाहून सगळेच हत्तीच्या समजदारपणाचं आणि प्रेम व्यक्त करण्याच्या त्याच्या स्टाईलचं कौतुक करत आहेत. नेटकरी या हत्तीवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
व्हिडिओमध्ये दिसतं की हत्ती एखाद्या मनुष्याप्रमाणे आपल्या प्रेयसीला प्रपोज (Elephant Proposal Video) करण्यासाठी गुलाबी रंगाचा पुष्पगुच्छ आपल्या सोंडेत घेऊन येतो. तो आपल्या हत्तीणीजवळ जाऊन तिला प्रपोज करतो आणि हा गुच्छ देतो. हत्तीणही त्याचं प्रपोजल अतिशय प्रेमाने स्वीकारते आणि दोघंही एकमेकांप्रतीचं प्रेम दर्शवतात. हा व्हिडिओ पाहून तुमच्या चेहऱ्यावरही हसू येईल. प्राण्यांकडे इतकी हुशारी कशी येते, असा प्रश्न तुम्हालाही पडेल.
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर Elephantsofworld नावाच्या पेजवरुन शेअर कऱण्यात आला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. व्हिडिओला जवळपास दीड लाख लाईक्स मिळाले आहेत. इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.