मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या भाषणाचे एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी केले कौतुक

0

औरंगाबाद,दि.९: मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या (CM Uddhav Thackeray) औरंगाबादमधील भाषणाचे एमआयएमचे (MIM) नेते इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी कौतुक केले आहे. औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार टीका केली. मी आत्ताही शहराचं नाव बदलू शकतो, मात्र, नाव बदललं आणि पाणी प्रश्न तसाच राहिला, इतर प्रश्न तसेच राहिले तर संभाजी महाराज मला टकमक टोकावर नेतील असे उद्धव ठाकरे म्हणाले.

उध्दव ठाकरे म्हणाले, “मी पहिल्यांदा औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर बोलणार आहे. मी पाणी प्रश्न असताना त्याकडे तोंड फिरवणार नाही. मी असा मूर्ख राजकारणी आहे जो या पाणी प्रश्नाला भिडतो आहे. कारण माझ्याकडे प्रामाणिकपणा आहे. किती वर्ष ऐकत बसणार? आता निधी मंजूर केलाय, वेळेत पाणी योजना पूर्ण झाली नाही, तर ठेकेदारांना दयामाया न करता तुरुंगात टाकणार आहे.”


उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर भाजपाने ही टोमणे सभा असल्याचे सांगत निशाणा साधला आहे. मात्र एमआयएमचे नेते आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणाचं स्वागत केलं आहे. 

इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विकासाच्या मुद्यांवर जोर दिल्याचं म्हटलं आहे. तसचे उद्धव ठाकरे यांनी चांगले मुद्दे मांडले. त्यांचं स्वागत आहे, असं इम्तियाज जलील म्हणाले. तसेच ‘राज्यसभा निवडणुकीसाठी आत्तापर्यंत महविकास आघाडी, भाजपा किंवा अन्य कुणीही संपर्क केला नाही. तुम्ही आले, संपर्क केला तर आम्ही विचार करू पण, मतदान करतांना आमच्या अटी आहेत’ अशी ऑफरही इम्तियाज जलील यांनी यावेळी दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here