तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्या मार्गावरून जातील त्या मार्गावर फुलांची उधळण करू: इम्तियाज जलील

0

औरंगाबाद,दि.१: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) ज्या मार्गावरून जातील त्या मार्गावर फुलांची उधळण करू असे AIMIM चे इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी म्हटले आहे. उध्दव ठाकरे यांच्या सभेचे औरंगाबाद येथे ८ जून रोजी आयोजन करण्यात आले आहे. औरंगाबाद येथे पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. शहरातील पाणी प्रश्न गंभीर असून येथील नागरिकांना आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन भुलवणं कठीण आहे, असं इम्तियाज जलील म्हणाले. 

“उद्धव ठाकरे जाहीर सभा घेतील पण औरंगाबादला पाणी देऊ शकणार नाहीत. ते फक्त इथं देऊन धर्माचा आणि हिंदुत्वाचा मुद्दा काढणार आहेत. ज्या शहराला ते महापुरुषाचं नाव देत आहेत. त्या शहराला सध्या दहा दिवसांच्याआड पाणी येत आहे. याचा ते विचारही करत नाहीयत. उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद शहराला पाणी कधी मिळणार याची नेमकी तारीख जाहीर केली तर ज्या मार्गानं ते जाणार आहेत. त्या मार्गावर फुलांची उधळण आम्ही करू”, असं आव्हान इम्तियाज जलील यांनी दिलं आहे. 

नाहीतर आम्ही ईडीकडे तक्रार करू

एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीला भाजपाने एक हजार कोटी रुपये दिले होते. निवडणुकीत शिवसेनेची मतं खाण्यासाठी हे पैसे दिले गेले होते असा आरोप खैरेंनी केला. त्यावर आज इम्तियाज जलील यांनी प्रत्युत्तर दिलं. “आम्हाला एक हजार नाही, तर दहा हजार कोटी रुपये दिले होते. हे पैसे स्वत: चंद्रकांत खैरे यांनी आणून दिले होते आणि त्यात ५०० रुपयाच्या चार नोटा कमी होत्या. खैरेंनी चहा पाण्यासाठी त्या ठेवून घेतल्या होत्या. त्यांनी अजूनही त्या परत केलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी त्या परत कराव्यात नाहीतर आम्ही ईडीकडे तक्रार करू”, असा खोचक टोला इम्तियाज जलील यांनी लगावला. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here