Viral Video: एका महिन्यात हमखास कॅन्सर व्हावा अशी इच्छा असेल तर लगेच गुटखा घ्या

0

Viral Video: सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होतात. अनेक व्हिडिओ हे मनोरंजनात्मक असतात. बरेचसे व्हिडिओ हे अनेकांना आवडतात. मार्केटिंगचेही अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. प्रत्येकाची मार्केटिंगची स्वतःची अशी एक पद्धत असते. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात एक सेल्समन अनोख्या पध्दतीने गुटखा विकताना दिसून येत आहे.

एका महिन्यात हमखास कॅन्सर व्हावा, अशी इच्छा असेल तर माझ्याकडचा गुटखा जरूर विकत घ्या, असं ओरडणाऱ्या सेल्समनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. अनेक सेल्समन त्यांच्या जवळील वस्तूंचे वैशिष्ट्य सांगताना दिसून येतात, मात्र येथे उलट दिसून येते. गुटखा विकणारा चक्क गुटख्याचे दुष्परिणाम सांगून गुटखा विकताना दिसून येत आहे.

व्हायरल व्हिडिओत गुटखा विकणारा गुटख्याचे दुष्परिणाम सांगून गुटका विकत घेण्याचे आवाहन करताना दिसून येत आहे. गुटखा विक्रेता गुटख्यामुळे काय नुकसान होते हे सांगत आहे. गुटखा खाल्ल्यामुळे हमखास कॅन्सर होईल, असं सांगत हा गुटखा विकत आहे. ब्रेकअप झाल्यामुळे जर कुणी दुःखात असेल आणि स्वतःचं आयुष्य संपवण्याची इच्छा होत असेल, तर माझ्याकडचा गुटखा घ्या, असा आग्रह हा तरुण करतो. हा तरुण ज्या ज्या ठिकाणी गुटखा विकण्यासाठी जाईल, तिथे तो सर्वांचं लक्ष वेधून घेतो आणि गुटखा विकण्याची त्याची स्टाईल पाहून सर्वांनाच हसू फुटतं.

ज्यांचं स्वतःच्या आयुष्यावर प्रेम नाही आणि ज्यांना मृत्यूचं भयंकर आकर्षण आहे, त्यांनी तातडीनं आपला गुटखा विकत घेऊन खावा, असं म्हणत मार्केटिंगची अनोखी स्टाईल असणाऱ्या या तरुणाकडं ट्रेनमधील सगळेजण लक्ष देऊन पाहत राहतात. त्याच्या घोषणा ऐकून उपस्थितांमध्ये हशा पिकतो.

आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी हा व्हिडिओ शेअर केला असून मार्केटिंग विथ वॉर्निंग असं नाव या व्हिडिओला दिलं आहे. सध्या हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून त्याला युजर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here