धोकादायक ॲप: हे App फोनमध्ये असेल तर लगेच करा Delete, अन्यथा होईल नुकसान

0

दि.२८: धोकादायक ॲप: Google नेहमीच धोकादायक Apps प्ले स्टोअर वरून डिलीट करत असते. अलीकडच्या काळात ऑनलाईन व्यवहारात वाढ झाली आहे तसेच ऑनलाईन फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. गुगलने यापूर्वीच अनेक धोकादायक ॲप्स प्ले स्टोअर वरून डिलीट केले आहेत. गेल्या काही काळात हॅकिंगचे प्रमाण वाढले आहे. Hackers युजर्सच्या डिव्हाइसमध्ये चुकीच्या पद्धतीने प्रवेश मिळून त्यांची महत्वाची माहिती चोरतात. यात अनेकदा पर्सनल आणि बँकिंग डिटेल्सचा देखील समावेश असतो. नुकत्याच समोर आलेल्या अहवालानुसार फोनमधील काही Apps युजर्सचा डेटा चोरत असल्याचे सांगण्यात येत आहे. आजकाल फोटो-एडिटिंग, बँकिंग, सोशल मीडिया, शॉपिंगसाठी अनेक मोबाइल ॲप्स उपलब्ध असून युजर्स ते देखील मोठ्या प्रमाणात वापरतात. पण, अनेकवेळा हॅकर्स याचा फायदा घेऊन फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात. स्कॅमर लक्ष्यित डिव्हाइसवर Malicious Apps ॲप्स Install करण्याचा प्रयत्न करतात. परिणामी युजर्सचे डिव्हाइस हॅक होते आणि त्यांच्या डेटाच्या गैरवापराच्या शक्यता देखील वाढतात.

या Malicious Apps ना लक्ष्यित डिव्हाइसवर इन्स्टॉल केल्यानंतर, स्कॅमरना युजर्सच्या व्हिडिओ आणि लॉगिन क्रेडेन्शियल्स सारख्या खाजगी डेटामध्ये प्रवेश मिळवत असल्याचे युजर्सना माहिती आहेच. शिवाय, अशा ॲप्सबाबत वेळोवेळी अहवाल येतच असतात. आता पुन्हा एकदा मालवेअरबाबत एक नवीन अहवाल आला आहे. अहवालानुसार, Craftsart Cartoon Photo Tools ॲप युजर्सचे फेसबुक लॉगिन तपशील चोरत आहे. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, हे ॲप स्कॅमिंगसाठी वापरले जाऊ शकते. हे ॲप युजर्सना त्यांचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड विचारते यानंतर, ते युजरला रशियामधील सर्व्हरवर रिडायरेक्त्ट करते. जिथे त्याला क्रेडिट कार्ड माहिती, मेसेज, शोध यासारखी खाजगी आणि गोपनीय माहिती मिळते. Google ने हे ॲप हटवले असले तरी हजारो यूजर्सना टार्गेट केल्याचे सांगण्यात येत आहे.

जर तुम्ही देखील हे ॲप इन्स्टॉल केले असेल तर तुम्हाला ते त्वरित हटवावे लागेल. मुख्य म्हणजे हे Apps फक्त ते Android फोनवरून हटवणे पुरेसे नाही. यानंतर तुम्हाला Facebook लॉगिन डिटेल्सही बदलावे लागतील. Google च्या मते, हे ॲप १००,००० पेक्षा जास्त वेळा इन्स्टॉल करण्यात आले आहे. इतकेच नाही तर, हे ॲप अजूनही युजर्सकडून वापरले जात असल्याचे मानले जात आहे. अशा धोकादायक Apps पासून जर तुम्हाला तुमचे डिव्हाइस सुरक्षित ठेवायचे असेल तर, Google Play Protect चा वापर सुरु ठेवावा लागेल. तसेच, आणि कोणत्याही Third party ठिकाणाहून अॅप इंस्टॉल करणे देखील टाळावे लगेल. या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास हे धोकादायक Apps तुमचा महत्वाचा डेटा चोरू शकतात आणि तुमचे मोठे नुकसान देखील करू शकतात.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here