माणसं गोळा करण्यावर जर टॅक्स असता तर मुश्रीफ सर्वाधिक टॅक्स भरणारे असते: नाना पाटेकर

0

कोल्हापूर, दि.५: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचे मित्र आहेत. नाना पाटेकर आणि अजित पवार यांच्यातील मैत्रीची कल्पना तर सगळ्यांच आहे. याचाच प्रत्यत कोल्हापुरात पुन्हा एकदा पाहायला मिळाला.

कागल येथील कार्यक्रमात संबोधित करताना नानांना अजित पवारांची आठवण झाली आणि त्यांनी तोंडभरुन आपल्या मित्राचं कौतुक केलं. “अजित आता खूप बदलला आहे. तो बोलताना आता खूप विचार करुन बोलतो. प्रत्येक शब्द जपून वापरतो. कुणाला दरडवायचं असेल तर विचारपूर्वक दरडावतो”, असं नाना पाटेकर म्हणाले. तर कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा उल्लेख नानांनी मर्फी बॉय असा केला आणि त्यांना चित्रपटात काम करण्याचा सल्ला दिला. 

कागल शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, ज्योतिबा फुले आणि महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याचा अनावरण समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर देखील उपस्थित होते. अजित पवार, हसन मुश्रीफ आणि नाना पाटेकर हे चांगले मित्र आहेत. याचंच प्रचिती नानांच्या भाषणातून यावेळी पाहायला मिळाली.

“कोल्हापुरात पुतळ्यांचे नव्हे, तर विचारांचे अनावरण झाले आहे. माणसं गोळा करण्यावर जर टॅक्स असता तर मुश्रीफ सर्वाधिक टॅक्स भरणारे असते. आता मुश्रीफ तुम्ही सिनेमात काम करा. मी तुमच्या कागलमधून निवडणूक लढतो. तुम्ही नुसतं सांगितलं तरी मी आरामात निवडून येऊ शकतो. ते इतके गोंडस दिसतात की मर्फीच्या जाहिरातीतील मुलगा हा मुश्रीफच होते की काय असं वाटतं”, असं मिश्किल विधान नाना पाटेकर यांनी यावेळी केलं आणि हशा पिकला. 

अजितदादा आता खूप बदलले

नाना पाटेकर यांनी यावेळी अजित पवार यांचंही तोंडभरुन कौतुक केलं. “अजितदादा इथं असते तर मजा आली असती. त्यांची एक बोलण्याची धाटणी आहे. आता पूर्वीचे दादा आणि आताचे दादा यांच्यात जमीन-आसमानाचा फरक झालाय बरं का. दादा आता ज्यावेळी बोलतात तेव्हा प्रत्येक शब्द अगदी विचार करून. एखादा शब्द कसा वापरायचा, कसं बोलायचं आणि समोरच्याला कसं झाडायचं. तेही शांतपणे कुठलाही त्रागा न करता. तर मला असं वाटतं की दादांच्या आयुष्यातील हे फार मोठं यश आले. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत काम करायचं. सकाळी साडेपाचला उठून या माणसाचं काम जे सुरू होतं त्याबद्दल अजितदादांचे धन्यवाद”, असं नाना पाटेकर म्हणाले.  


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here