भारताने आठव्यांदा धुळीस मिळवलं पाकिस्तानचं स्वप्न

0

अहमदाबाद,दि.14: नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात वर्ल्ड कपचा (World Cup 2023) 12 वा सामना खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा लाजीरवाणा पराभव केला आहे. वर्ल्ड कपच्या 12 व्या सामन्यात पाकिस्तानने दिलेल्या 192 धावांचं आव्हान पार करताना भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. याच बरोबर आयसीसी वर्ल्ड कपमध्ये (ICC World Cup 2023) टीम इंडियाने आठव्यांदा पाकिस्तानचा पराभव केला आहे.

पाकिस्तानने भारताला 192 धावांचं आव्हान दिलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना टीम इंडियाने 7 गडी राखून सामना (India beat pakistan) जिंकला आहे. भारताकडून शार्दुल ठाकूर वगळता इतर पाच गोलंदाजांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या तर फलंदाजीमध्ये कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) चमकला. त्याने 63 बॉलमध्ये 86 धावांची धुंवाधार खेळी केली अन् टीम इंडियाला विजय मिळवून दिला आहे.

दुहेरी आकडा गाठता आला नाही

पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक 50 धावा केल्या. गेल्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या मोहम्मद रिझवानचे यावेळी अर्धशतक हुकले. तो 49 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. इमाम उल हकने 36, अब्दुल्ला शफीकने 20 आणि हसन अलीने 12 धावा केल्या. याशिवाय सहा फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. सौद शकील ६ धावा करून कुलदीपचा शिकार झाला. मोहम्मद नवाज आणि इफ्तिखार अहमद यांनी प्रत्येकी चार धावा करून बाद झाले, शादाब खान आणि हारिस रौफ यांनी प्रत्येकी दोन धावा केल्या.

पाकिस्तानने दिलेल्या 192 धावांचं आव्हान पार करताना भारताने प्रेशर घेतलं नाही. पाकिस्तानच्या शाहिन शाह आणि हसन अलीला चोपण्यास सुरूवात केली. मात्र, मोठा शॉट मारण्याच्या नादात शुभमन गिल (Shubhman Gill) बॉल पॉईंटला उभ्या असलेल्या शाबादच्या हातात बॉल सोपवला. त्यानंतर विराट कोहलीने (Virat Kohli) पाकिस्तानला कव्हर ड्राईव्हचे जलवे दाखवले. विराट देखील एका खराब बॉलवर कॅच आऊट झाला. त्यानंतर मैदानात आलेल्या श्रेयस अय्यरने सावध सुरूवात करत रोहितला (Rohit Sharma) साथ दिली. रोहित बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी काम फत्ते केलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here