सोलापूर आयटी पार्कबाबत जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली महत्त्वाची माहिती 

0

सोलापूर,दि.11: IAS Kumar Ashirwad On Solapur IT Park: सोलापूर आयटी पार्कबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. सोलापुरात आयटी पार्क उभारण्यासाठी हालचालींना वेग आला असून आयटी पार्कसाठी लागणाऱ्या पूरक गोष्टी बाबतचा अहवाल तयार करण्यात आला असून हा अहवाल 30 ऑक्टोबर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची महत्त्वाची माहिती 

शुक्रवारी, जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी पत्रकारांशी संवाद ते म्हणाले भुवनेश्वरमध्ये 48 लाखांपासून आयटी उद्योगाचा व्यवसाय सुरू झाला. तिथे आज आयटी उद्योगात ८ हजार कोटींची उलाढाल होत आहे. तेथील आणि सोलापूरची लोकसंख्या सारखीच आहे. त्यामुळे सोलापुरात आयटी उद्योगाला पोषक वातावरण असून सोलापूरलाही शून्यापासून सुरूवात करावी लागेल.

भुवनेश्वर प्रमाणे सोलापुरातही आयटी उद्योजक येतीलआयटी उद्योजकांना पायाभूत सुविधा तसेच इतर सवलती द्याव्या लागतील, यासह इतर काही मुद्दे असलेला  शंभर पानी अहवाद तयार केला असून हा अहवाल मुख्यमंत्री फडणवीस यांना देण्यात येणार आहे. आयटी पार्कसाठी सोलापुरात अधिकाऱ्यांची लवकरच बैठक होणार आहे. सोलापुरातील उपजिल्हाधिकारी सदाशिव फडदुणे, उपजिल्हाधिकारी सीमा होळकर, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी शिवाजी राठोड, तसेच विजय जाधव यांच्या पथकाने भुवनेश्वर दौरा केला आहे. असेही त्यांनी सांगितले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here