सोलापूर,दि.२०: IAS Kumar Ashirwad On Solapur IT Park | सोलापूर आयटी पार्कबाबत (Solapur IT Park) जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी महत्वाची माहिती दिली आहे. अनेक वर्षापासून सोलापूर येथे आयटी पार्क सुरु करावी अशी मागणी केली जात होती. मात्र राजकीय नेत्यांनी याबाबत दुर्लक्ष केल्याने सोलापूर येथे आयटी पार्क सुरू झाले नाही. प्रत्येकवेळी विविध राजकीय पक्षांकडून फक्त आश्वासने दिली जात होती. मात्र आता आयटी पार्कबाबत हालचाली वाढल्या आहेत असे दिसून येत आहे.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले… | IAS Kumar Ashirwad On Solapur IT Park
आयटी पार्क उभारणीच्या कामाला गती मिळाली असून जागा निश्चित करण्यासाठी एका खासगी संस्थेची नियुक्ती करण्यात आली तर आयटी पार्क चा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत केली असून ही समिती भुवनेश्वर, म्हैसूर आणि इंदोरला भेट देणार असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.
आयटी पार्क साठी लागणाऱ्या जागेच्या सर्व्हेसाठी संबंधित संस्थेला ८ लाख रुपये मानधन देण्यात येणार असून त्यासाठीचा निधी जिल्हा नियोजन समितीकडून उपलब्ध करून दिला जाईल. पुढील आठ दिवसांत ही संस्था कोणती जागा आयटी पार्कसाठी उपयुक्त असेल, याबाबतचा अहवाल सादर करणार आहे. भुवनेश्वर, म्हैसूर आणि इंदौर परिसरातील आयटी पार्कचा अभ्यास करून तसा पॅटर्न सोलापुरात लागू करण्याचा प्रयत्न आहे.
या अभ्यास दौऱ्यात उपजिल्हाधिकारी सीमा होळकर, एमआयडीसीचे उपविभागीय अधिकारी शिवाजी राठोड आणि सोलापूर आयटी असोसिएशनचे अध्यक्ष अपूर्व जाधव आदी सहभाग असणार आहे. दोन दिवसांच्या दौऱ्यानंतर तेथील अनुभव व निरीक्षणांचा अहवाल ते सादर करतील. हा अहवाल त्याचबरोबर जागे बाबतचा खासगी संस्थेचा अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविण्यात येईल. पुढील आठवड्यात पुणे व हैदराबादमधील आयटी उद्योजक सोलापुरात येणार असून त्यांच्यासमोरही हा अहवाल मांडला जाईल. त्यांच्या अपेक्षा, सूचना जाणून घेतल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.








