योगी किंवा मोदीला मी घाबरत नाही: असदुद्दीन ओवेसी

0

दि.17: ज्ञानवापी मशीदीच्या मुद्द्यावर बोलताना AIMIM चे नेता असदुद्दीन ओवेसी यांनी मोठं विधान केलं. “मी या मुद्द्यावर बोलतच राहणार. कारण मी फक्त अल्लाला घाबरतो, बाकी कोणाचीही मला भीती नाही. योगी किंवा मोदीला मी घाबरत नाही”, असं ते म्हणाले. गुजरातमधील छापी या ठिकाणी ते एका सभेत बोलत होते.

ज्ञानवापी मशीद (Gyanvapi Masjid) प्रकरणी यायालयाने ज्ञानवापी मशिदीची व्हिडिओ तपासणी सुरू ठेवण्यास सांगितले होते. ज्ञानवापी मशीद सर्वेक्षण प्रकरणात, उत्तर प्रदेशातील न्यायालयाने ज्ञानवापी मशीद संकुलातील तलाव जिथे “शिवलिंग” सापडले आहे सील करण्याचे आदेश दिले आहेत.

“मी जेव्हा ज्ञानवापी मुद्द्यावर बोलण्यास सुरूवात केली, त्याच वेळी काही मुस्लीम संघटनांनी माझ्यावर टीका करायला सुरूवात केली. त्या संघटनांनी मलाच विचारलं की तुम्ही या मुद्द्यावर कशाला बोलता? मला असे प्रश्न विचारणाऱ्यांना मी विचारू इच्छितो की मी जर बोललो नाही तर तुम्ही या मुद्द्यावर तोंड उघडणार आहात का? जे लोक मला ‘बोलू नका’ असं सांगत आहेत, त्यांनी स्वत:तरी या मुद्द्यावर बोलावं. मी या साऱ्यांना सांगतो की, मी बोलतच राहणार. कारण मला अल्लाची सोडून इतर कोणाचीही भीती वाटत नाही. मी योगी किंवा मोदी यांना घाबरत नाही”, असे विधान ओवेसींनी गुजरातमध्ये केले.

“मी बोलतो कारण मी जिवंत आहे. माझ्यात अजूनही जीव शिल्लक आहे. मी बोलतो कारण मी अजूनही माझ्या धर्माशी इमान राखलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, मी बोलत आणि बोलतच राहणार कारण मी फक्त अल्लाह ला घाबरतो. कोणत्याही योगी किंवा मोदीला मी घाबरत नाही. मला बोलण्याचा अधिकार आहे. जर तुम्हाला मी बोललेल्या गोष्टी आवडत नसतील तर तुम्ही स्वत:च्या कानात बोटं घाला, पण मी मात्र बोलायचा थांबणार नाही”, असे ओवेसी म्हणाले.

नमाजावर बंदी घालणे योग्य नाही : सुप्रीम कोर्ट

सुनावणीदरम्यान सॉलिसिटर जनरल मेहता यांनी आक्षेप घेत म्हटले की, वृत्तात शिवलिंग विहिरीत सापडल्याचे म्हटले आहे. नमाज आणि वजूला परवानगी दिल्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. यावर मुस्लीम पक्षाने सांगितले की, 16 मे रोजी दिलेला कनिष्ठ न्यायालयाचा आदेश अयोग्य होता. असा आदेश पारित करता येणार नाही. नमाजांवर बंदी घालणे योग्य नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. ते कसे करायचे हे स्थानिक प्रशासनाने ठरवावे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here