“मी 96 कुळी मराठा आहे, आयुष्यात कुणबी…” नारायण राणे

0

मुंबई,दि.19: मी 96 कुळी मराठा आहे, आयुष्यात कुणबी दाखला घेणार नाही असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. मी 96 कुळी मराठा आहे, कुठलाच मराठा कुणबी दाखला घेणार नाही असं पुनरूच्चार केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला आहे. मराठा आणि कुणबी हे दोन वेगवेगळे आहेत, मी आयुष्यात कुणबी दाखला घेणार नाही असंही ते म्हणाले.

हमासचे कौतुक करणाऱ्या शरद पवारांना (Sharad Pawar) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात चांगले काम केलेलं दिसत नाही का असा थेट सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी विचारला. शरद पवार हे काही लोकांना वाचवण्यासाठी ना देशाच्या हिताचे बोलतात ना समाजाच्या हिताचे अशी टीकाही त्यांनी केली. शरद पवारांना मोदी विरोधाची काविळ झाल्याने त्यांनी केलेली चांगली काम त्यांना दिसत नाहीत असे नारायण राणे म्हणाले.

1993 सालच्या बाँबस्फोटात तेरावा बाँबस्फोट मशिदीत झालाच नव्हता, मग त्यावर त्यावेळचे मुख्यमंत्री खोटं का बोलले? एका ठराविक समूदायाच्या लोकांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न त्यांनी का केला? असा सवाल नारायण राणे यांनी विचारला.

नारायण राणे काय म्हणाले?

पवार यांनी इस्त्रालय आणि हमास बाबत केलेली टीका चुकीची आहे. इस्त्रायलवर दहशतवादी हल्ल्याबाबत मोदींनी भूमिका मांडली होती. पॅलेस्टिनविरोधातली ती भूमिका नव्हती. शरद पवारांनी देशात आणि राज्यात बरीच पदं भूषवली आहेत. मला त्यांना आठवण करुन द्यायची आहे की 1992 ला साखळी बाॅम्बस्फोटात अनेक मृत्यू झालेत, तेव्हा मशिदीमध्ये खोटा बाॅम्बस्फोट झाला अशी अफवा त्यांनी पसरवली? पवार साहेब देश प्रथम अशी भूमिका कधी घेणार आहेत?

केंद्र सरकारनं जुलै 1993 मध्ये एन.एन.व्होरा यांची समिती नेमली. या समितीने दाऊद आणि मेमन गॅंगचे राजकारण्यांशी त्यांचे सुमधूर संबंध असल्याचं अहवालात सांगितलं होतं.पवार साहेबांना माहिती आहे त्यात कोणाकोण होतं ते. व्होरा समितीत काँग्रेसच्या नेत्यांची दाऊदशी संबंध असलेली नावं आहेत. मी काँग्रेसमध्ये असताना नावं देखील सांगितली होती. पवार साहेब तुम्ही अशा वेळेला बोलता जे जनतेच्या हिताचं ना राष्ट्राच्या हिताचं असतं.

जनतेला वाहून घेतलेल्या लोकांवर तुम्ही टीका करता. गेल्या 9 वर्षात 55 योजना मोदींनी जाहीर केलेल्या आहेत. असं असताना मोदी आपल्याला गुरु मानतात तरीही आपण असं वागता? आपण समजून घ्या… तुम्ही हमासची बाजू घेता आहात. व्होरा समितीची मी माहिती काढली, चांगल्याला चांगलं म्हणणं अभिप्रेत आहे. आम्ही टीका ऐकणाऱ्यामधले नाही, जशास तसे उत्तर दिलं जाईल. पवार आता कोणत्या क्षेत्रासाठी कामं करतायत? आता ते फक्त पार्टी वाचवण्याचं ते काम करतायत. बॅाम्बस्फोट त्यांच्याच कार्यकाळात का होतात? यासंदर्भात संशोधन करायला हवं. दहशतवादाविरोधात आम्ही कोणत्याही देशाला मदत करण्यास तयार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here