इलेक्ट्रिक बाईकच्या शोरुमध्ये भीषण आग, ८ जणांचा होरपळून मृत्यू

0

हैदराबाद,दि.१३: इलेक्ट्रिक बाईकच्या शोरुमध्ये भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. यात ८ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. हैदराबादमध्ये इमारतीला लागलेल्या भीषण आगीत होरपळून आठ जणांचा मृत्यू झाला असून, काही जण जखमी आहेत. सोमवारी रात्री सिकंदराबादमध्ये इलेक्ट्रिक दुचाकींच्या शोरुममध्ये ही आग लागली. ही आग नंतर वरच्या मजल्यावर असणाऱ्या हॉटेलमध्ये पोहोचली आणि इमारतीमध्ये पसरली.

शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असा अधिकाऱ्यांचा प्रथामिक अंदाज आहे. शोरुम, बेसमेंट आणि पार्किगमध्ये असणाऱ्या गाड्यांनी पेट घेतला आणि नंतर मोठ्या प्रमाणात धूर झाला. यानंतर हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी धूर आणि आग पाहून अग्निशमन दलाला माहिती दिली.

अग्निशन दलाने घटनास्थळी पोहोचल्यानंतर इमारतीमध्ये अडकलेल्या सात जणांची सुटका केली. दोन जण जखमी असून त्यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान सरकारने ही घटना दुर्दैवी असून, जखमींना चांगले उपचार दिले जातील अशी माहिती दिली आहे. लॉजमध्ये राहणारे इतर शहरांमधून कामानिमित्त आले होते, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, यामध्ये लोक आपला जीव वाचवण्यासाठी रुमच्या खिडकीबाहेर उभे असल्याचं तसंच पाइपच्या सहाय्याने आपली सुटका करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. गृहमंत्री आणि शहर पोलीस आयुक्तांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here