HSC Exam Update: बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात अंशतः बदल

0

दि.२४: HSC Exam Update: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या (HSC Exam Date) वेळापत्रकात अंशत: बदल करण्यात आला आहे. बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात मंडळाने अंशत: बदल केला आहे. असे असले तरी परीक्षा नियोजित वेळेतच सुरू होणार आहे, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

५ आणि ७ मार्च रोजी होणाऱ्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. भाषा विषयांचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. इयत्ता बारावीची परीक्षा ४ मार्च रोजी सुरू होणार आहे. पण यातील ५ मार्च रोजी होणारा पेपर आता ५ एप्रिल रोजी, तर ७ मार्च रोजी होणारा पेपर ७ एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. काल पुणे-नगर मार्गावर पुण्याच्या दिशेने येत असताना एका ट्रकला आग लागली होती. या ट्रकमध्ये बारावीच्या प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या होत्या. जळून खाक झालेल्या प्रश्नपत्रिका याच विषयांच्या असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे बारावीच्या वेळापत्रकात अंशत: बदल करण्याची नामुष्की बोर्डावर आली आहे. 

हेही वाचा Breaking: १२ वी पुणे बोर्डच्या प्रश्नपत्रिका ट्रकला लागलेल्या आगीत जळून खाक



५ मार्चला सकाळी हिंदी तर दुपारच्या सत्रात जर्मन, जपानी, चिनी आणि पर्शियन विषयाचे पेपर होणार होते. तर, ७ मार्चला सकाळच्या सत्रात मराठी, गुजराती, कन्नड, सिंधी,(अरेबिक, देवनागरी), मल्याळम, तामिळ, तेलुगु, पंजाबी, बंगाली, आणि दुपारच्या सत्रात उर्दू, फ्रेंच, अर्धमागधी, स्पॅनिश आणि पाली विषयाचा पेपर होणार होता. हे पेपर आता ५ एप्रिल रोजी होणार आहेत. 

७ मार्चला सकाळच्या सत्रात मराठी, गुजराती, कन्नड, सिंधी, (अरेबिक, देवनागरी), मल्याळम, तामिळ, तेलुगु, पंजाबी, बंगाली, आणि दुपारच्या सत्रात उर्दू, फ्रेंच, अर्धमागधी, स्पॅनिश आणि पाली विषयाचा पेपर होणार होता. ते आता ७ एप्रिल रोजी होतील.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here