श्री सिद्धमल्लिकार्जून प्रतिष्ठानच्यावतीने श्री सिध्देश्वर यात्रेतील मानकरी सेवेकरींचा गौरव

0

सोलापूर,दि.२४: ग्रामदैवत श्री सिध्देश्वर महाराजांच्या यात्रेतील प्रमुख मानकरी, विश्वस्त,नागफणी नंदीध्वज मानकरी, नंदीध्वज धारक व मास्तर, नगर प्रदक्षिणा विसावा धारक, मुंडन व पादुका पालकीधारी, झोळीधारी, मळीमंगळसुत्र करणारे, हुमादेवी, संबळ कावड, अडुसष्ठ लिंग तैलाभिषेक व अष्टगंध लावणारे, नागफणी व खेळणा बनवणारे, भगवा झेंडा मानकरी, पायघड्या घालणारे, वाजंत्री सेवा, हलगीवादक, शोभेचे दारूकाम करणारे, सुत्रसंचालन करणारे अशा सन्मानीय सेवेकरींचा मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

या प्रसंगी काशी पिठाचे उत्तराधिकारी डॉ.मल्लिकार्जुन शिवाचार्य स्वामीजी यांनी बोलताना प्रतिष्ठाने केलेल्या कार्यक्रमाचे कौतुक करत असा कार्यक्रम पहिल्यांदाच होत असून त्यांच्या कार्यास शुभेच्छा व पुढील काही दिवसात काशीपीठात उत्तराधिकारीपदी म्हणून निवड होतं असताना आपण सर्व सोलापूरकर मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले नंतर मनोज हिरेहब्बू यांच्या विनंतीस मान देऊन सिद्धरामेश्वरांची यात्रा हे सिमीत नसून याची प्रचिती सर्वदूर पोहचविण्यासाठी दिल्ली येथे लालकिल्यावर येत्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त पथ संचनात यात्रेची प्रतिकात्मक चित्ररथ करण्यासाठी प्रयत्न करू असे प्रतिपादन केले.

या प्रसंगी सद्गुरु शिवपुत्र महास्वामीजी, नीलकंठ शिवाचार्य महाराज, बसवराज शास्त्री यांनी देखील प्रतिष्ठानच्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे कौतुक करत प्रतिष्ठानच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी मनोज हिरेहब्बू, जगदीश हरेहब्बू, सागर हिरेहब्बू, सोमशंकर देशमुख, तम्मा मसरे, सुधीर थोबडे, संदेश भोगडे, सोमनाथ मेंगाणे, सुहास शेटे, योगीराज कुंभार, आनंद हब्बु, बाळासाहेब भोगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे आयोजन गणेश चिंचोळी, सचिन शिवशक्ती, आनंद दुलंगे, राजेश नीला यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अमोल साखरे, प्रसाद बसवंती, मल्लिनाथ सोलापूरे, सिद्धू हत्तरकी, श्रीमंत मेरू, सिद्धाराम बिराजदार, शुभम शिवशक्ती, विनीत म्हेत्रे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रस्तावना संयोजक गणेश चिंचोळी, सूत्रसंचालन महेश कोटीवले तर आभार सागर अतनुरे यांनी मानले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here