मनसेच्या मागणीला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले उत्तर

0

मुंबई,दि.२०: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील लाऊड स्पीकरला विरोध केला आहे. प्रार्थनेला विरोध नसून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करायला हवे अशी भूमिका राज ठाकरेंनी घेतली. त्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ट्विट करत मशिदीमध्ये CCTV बसवावेत अशी मागणी केली.

“जवळपास सगळ्या मंदिरात CCTV लावले आहेत, परंतु मस्जिदीत CCTV आहेत का? “सर्वधर्मीय” प्रार्थना स्थळात CCTV यंत्रणा का करू नये?, असा सवाल बाळा नांदगावकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून विचारला आहे. तसेच, प्रार्थनास्थळात सीसीटीव्ही बसवल्यास अनेक चुकीच्या गोष्टींना चाप बसेल. तर, असे करण्यास कोणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही. सरकारने याची नियमावली बनवून त्याची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणीच नांदगावकर यांनी केली आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना मेन्शन केलं आहे. 

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

“मंदिरांमध्ये सीसीटीव्ही अनिवार्य करण्यासंदर्भात कोणी सूचना कोणी दिलेल्या नाहीत. मंदिरात जर कोणी स्वेच्छेनं, सुरक्षिततेच्या दृष्टीनं जर सीसीटीव्ही लावले असतील आणि अन्य बाकीच्या प्रार्थना स्थळांमध्ये ज्यांना सीसीटीव्ही बसवायचे असतील त्याला सरकारचा विरोध असण्याचं कारण नाही. आपल्या स्वेच्छेनं त्यांनी निर्णय घ्यावा,” असं वळसे पाटील म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here