Dilip Valse Patil On Raj Thackeray: राज ठाकरे यांच्या इशाऱ्यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं महत्वपूर्ण भाष्य

0

मुंबई,दि.१४: Dilip Valse Patil On Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या इशाऱ्यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil) यांनी महत्वपूर्ण भाष्य केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) गुढीपाडव्याला शिवाजी पार्कवर सभा घेतली होती. त्यानंतर राज ठाकरेंनी ठाण्यात सभा घेतली. यावेळी राज ठाकरेंनी मशिदींवरील लाऊड स्पीकर बाबत आपली भूमिका परत एकदा मांडली. ३ मे पर्यंत मशिदींवरील भोंगे काढण्यात यावे अशी मागणी राज ठाकरेंनी केली. ३ मे पर्यंत राज्यातील सर्व मशिदींवर भोंगे सरकारने उतरवावेत. आम्ही तोपर्यंत राज्य सरकारला मुदत देतो, असा अल्टिमेटम मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिला होता. यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी महत्वपूर्ण भाष्य केले आहे. सरकारने राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे वक्तव्य गांभीर्याने घेतले आहे. कोणत्याही परिस्थितीत राज्यात वेगळ्या प्रकारचे वातावरण निर्माण करून देणार नाही. त्यासाठी पोलीस सज्ज आहेत, असा इशारा दिलीप-वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी दिला. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी दिलीप वळसे-पाटील (Dilip Valse Patil) यांनी राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत केलेला दावा खोडून काढला. मशिदींवरील भोंग्यांना विरोध करताना ज्या न्यायालयीन निर्णयाचा आधार घेतला जातो, त्यामध्ये रात्री १० ते सकाळी ६ या काळात कोणत्याही ठिकाणी लाऊडस्पीकर्स वाजवू नयेत, असे म्हटले आहे. ज्याठिकाणी परवानगी घेऊन भोंगे लावले आहेत, ते काढण्याचा प्रश्नच येत नाही. न्यायालयाच्या निकालात याबाबत कोणताही उल्लेख नाही, या गोष्टीकडे गृहमंत्र्यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आम्ही सर्वांना सोबत घेऊन चालणारे लोक आहोत. आमच्यासाठी सर्वजण सारखे आहेत. पोलीस सज्ज असल्यामुळे कोणताही तणावाची परिस्थिती उद्भवणार नाही, अशा आशावादही दिलीप वळसे-पाटील यांनी व्यक्त केला.

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी भाजपच्या नेत्यांना न्यायालयाकडून मिळणाऱ्या दिलाशाबाबत सूचक भाष्य केले. यापूर्वी संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना न्यायालयाने अटकेपासून अंतरिम संरक्षण दिल्यानंतर ‘दिलासा घोटाळा’ असे ट्विट केले होते. गृहमंत्री वळसे-पाटील यांनीही कुठेतरी या भूमिकेचे समर्थन केले. विशिष्ट पक्षाच्या लोकांना दिलासा मिळत असेल तर आश्चर्य वाटणे साहजिक आहे. अशा परिस्थितीत हा प्रश्न कोणाच्याही मनात निर्माण होऊ शकतो. त्यामध्ये चुकीचे काहीही नाही, असे वळसे-पाटील यांनी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here