मुंबई,दि.18: महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्या सुरक्षेत वाढ करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. सोलापूर दौऱ्यावर असताना सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांना हॉटेलमालकाने रस्त्यावर अडवून बिलाचे पैसे मागितल्याची घटना सोलापूर दौऱ्यात घडली. सदाभाऊ खोत कारमधून खाली उतरताच मांजरी येथील अशोक शिनगारे यांनी त्यांच्या समोर येऊन उभे राहिले आणि त्यांना जाब विचारू लागले. 2014 साली लोकसभा निवडणुकीमध्ये सांगोला तालुक्यातील मांजरी येथे एका हाॅटेलमध्ये राहिलेले 66 हजार 450 रुपये बिलाचे देण्याचे राहिले असल्यामुळे हाॅटेल मालकाने ताफा अडवला.
राष्ट्रवादी काँग्रेसपासून (NCP) आपल्या जीविताला धोका असल्याचा आरोप सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केला आहे. गुरुवारी कथित हॉटेल बिलाच्या थकबाकीवरून व्हायरल झालेल्या व्हिडिओ मागे राष्ट्रवादीचा लाल टोमॅटोसारखा गाल असलेला नेता आहे असाही आरोप खोत यांनी केला. ताफा अडवून पैसे मागणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हे दाखल असल्याचे त्यांनी सांगितले.
सदाभाऊ खोत यांची सुरक्षा वाढवण्याचे आदेश दिल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. आज सकाळीच राज्याच्या पोलीस प्रमुखांना सदाभाऊ खोत यांची सुरक्षा वाढवण्याची सूचना दिली आहे, असं वळसे पाटील म्हणाले. पवार कुटुंबापासून मला धोका आहे, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता सदाभाऊ खोत यांची सुरक्षा वाढवण्यात येणार आहे.
सुरक्षेत वाढ करण्याच्या सूचना
पवार कुटुंबापासून आम्हाला धोका आहे, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं होतं. त्यावर दिलीप वळसे पाटील म्हणाले की, “मला वाटत नाही की सदाभाऊंच्या जीविताला धोका आहे. तरीसुद्धा त्यांनी जी भीती व्यक्त केली आहे, त्यांचं जीवन सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने मी आज सकाळीच राज्याच्या पोलीस प्रमुखांना सूचना दिल्या आहेत की सदाभाऊ खोत यांची सुरक्षा वाढवावी.”