हिंदुस्थान म्हणजे निर्लज्ज लोकांचा देश, शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

1

सांगली,दि.१५: हिंदुस्थान म्हणजे निर्लज्ज लोकांचा देश असं वकव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं आहे. जगात क्रमांक दोनची लोकसंख्या असलेला आपला देश आहे. एक नंबर लोकसंख्या असलेला देश चीन आहे. जगाच्या पाठीवर १८७ राष्ट्र आहेत. त्या सर्व राष्ट्रात बेशरमपणाचा देश म्हणजे हा हिंदुस्थान आहे आणि याची कोणाला लाज वाटत नाही, असे वादग्रस्त वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी केले आहे. ते शुक्रवारी सांगलीत दुर्गामाता दौडच्या समारोप प्रसंगी बोलत होते.

दारुची दुकाने उघडी ठेवायला सांगणारे आणि दुर्गामाता दौडीस बंदी घालणारे राज्यकर्ते बेशरम, नालायक आहेत अशी टीकाही यावेळी त्यांनी केली. जसे प्रभू रामचंद्र विवेक हरवून सोन्याच्या हरणाच्या मागे गेले आणि सीतेचे अपहरण झाले तसे राज्यकर्त्यांचा विवेक हरवला आहे असंही यावेळी ते म्हणाले. शिवाजी-संभाजी महाराजांची अंतकरणात वस्ती असती तर संपूर्ण देशाचे नेतृत्व करणारे राज्यकर्ते झाले असते असंही त्यांनी सांगितलं. दसऱ्यानिमित्त साध्या पद्धतीने आयोजित केलेल्या दुर्गामाता दौडीच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी बोलताना भिडे म्हणाले, करोना म्हणजे चीन, पाकिस्तान या आपल्या शत्रू देशांनी भारतावर केलेला छुपा वार आहे. करोना हा प्रकार काही खरा नसून थोतांड आहे. चीनने तुम्हाला आणि आम्हाला पालथं पाडण्यासाठी केलेली बदमाशी आहे. आपल्या महाराष्ट्राच्या राजकर्त्यांच्या अंतःकरणात शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची वस्ती असती, तर सबंध देशाचं नेतृत्व करणारे ठरले असते. पण दुर्दैवाने तसे नाही.

“जगाच्या पाठीवर १८७ राष्ट्रं आहेत. पण पारतंत्र्य गुलामी, दास्याच्या नरकात राहण्याचा बेशरमपणा लाज ज्यांना वाटत नाही अशा १२३ कोटी नागरिकांचा देश जगात आहे. प्रदीर्घ काळ परक्यांचा मार खात, दास्यत्व पत्करत, त्यांचं खरकटं खात, स्वाभिमानाची जाणीव नसलेला देश म्हणजे हिंदुस्थान,” असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे.

भल्या भल्याची बुद्धी निर्णय घेण्याच्या वेळी विकारवश होते तशा आताच्या राज्यकर्त्यांच्या अकला, बुद्धी ,मेंदू विकारवश झालेत, त्यामुळेच दुर्गामाता दौड करण्यास परवानगी दिली गेली नाही. दुर्गामाता दौडसारखी इतकी पवित्र गोष्ट कुठेही नाही. आमच्या दुर्गामाता दौडीवर बंदी आली तरी आमचा आमदार, खासदार राज्यकर्त्याना जाऊन खडसावत नाही. असल्या आमदार, खासदार यांच्या अस्तित्वाचा काय उपयोग? असा सवाल करत भिडे यांनी स्थानिक आमदार आणि खासदारांवर टीका केली.


1 COMMENT

  1. तुम्ही तर महा निर्लज्ज आहात लाज वाटायला पाहिजे हिंदुस्तानात राहून असं बोलायला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here