कोल्हापूर,दि.2: Hindu Akrosh Morcha: विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने लव्ह जिहाद, धर्मांतर आणि गोहत्याविरोधात काल (दि.1) शहरात हिंदू ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. हिंदुत्ववादी संघटनांकडून मोर्चाची सुरुवात सकाळी 10 वाजता बिंदू चौकातून होऊन मोर्चा मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, छत्रपती शिवाजी चौकमार्गे भवानी मंडपात दाखल झाला. येथे मोर्चाचे रूपांतर विराट सभेत झाले.
सकल हिंदू समाजाच्या वतीने विराट मोर्चा | Hindu Akrosh Morcha
सकल हिंदू समाजाच्या वतीने कोल्हापूर येथे रविवारी ‘लव्ह जिहाद’विरोधात ‘हिंदू आक्रोश’ मोर्चा (Hindu Akrosh Morcha) निघाला. मोर्चाच्या परिसराला भगवे वातावरण तयार झाले होते. तरुण, तरुणी, महिला यांच्यासह हिंदूत्ववादी संघटना मोर्चात सहभागी झाले होते.

काय आहेत मागण्या? | Kolhapur News
गोहत्या, लव्ह जिहाद आणि धर्मातरविरोधी कायदा लागू करावा या मागणीसाठी तसेच हिंदू धर्मीयांवरील अन्याय, अत्याचारविरोधात कोल्हापूर (Kolhapur News) येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. आंबेडकर, म. फुले यांच्या पुतळय़ाचे पूजन करून मोर्चाला सुरुवात झाली. प्रारंभी मैदानी, मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. मंत्रपुष्पांजली झाल्यानंतर भगव्या ध्वजाचे पूजन करण्यात आले.

परिसर भगवामय… | Kolhapur Latest News
ऐतिहासिक बिंदू चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. जुना देवल क्लब, मिरजकर तिकटी, महाद्वार रोड, पापाची तिकटी, छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गाने निघाला. भगवे कपडे, टोपी परिधान केलेले पुरुष, भगव्या साडय़ा परिधान केलेल्या महिला, मावळय़ांच्या वेशभूषेतील तरुण कार्यकर्ते, हातात भगवे झेंडे यामुळे मोर्चाच्या परिसराला भगवे स्वरूप प्राप्त झाले होते. दुर्गा मातेच्या वेशभूषेतील युवती लक्ष वेधून घेत होत्या. विविध ठिकाणी खाद्यपदार्थ, पाण्याच्या बाटल्या तसेच अष्टगंध याचे वाटप केले जात होते. (Kolhapur Latest News)
उत्साह अखेपर्यंत कायम…
उत्साह अखेपर्यंत कायम. मोर्चामध्ये खासदार धनंजय महाडिक, सुदर्शन वाहिनीचे संस्थापक सुरेश चव्हाणके, माजी आमदार राजेश क्षीरसागर, ठाकरे गट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, भाजपचे प्रदेश सदस्य महेश जाधव, वकील सुधीर जोशी वंदुरकर, अनिरुद्ध कोल्हापुरे, शिवानंद स्वामी, बंडा साळुंखे, महेश उरसाल यांच्यासह हिंदूत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.