Hijab Controversy: हिजाब संदर्भात या देशांमध्ये हे आहेत नियम, उल्लंघन केल्यास होते दंडात्मक कारवाई

0

दि.9: Hijab Controversy: कर्नाटक हिजाब प्रकरणाचे पडसाद संपूर्ण भारतभर उमटले आहेत. जानेवारी महिन्यात उडुपी येथील एका सरकारी महाविद्यालयातील 6 विद्यार्थिनींनी हिजाब परिधान करून महाविद्यालयात प्रवेश घेतल्याने वाद सुरू झाला होता. कॉलेज प्रशासनाने विद्यार्थिनींना हिजाब घालण्यास मनाई केली होती, परंतु तरीही त्यांनी तो परिधान केला होता, यावरून वाद निर्माण झाला होता. या वादानंतर इतर कॉलेजांमध्येही हिजाबबाबत गोंधळ सुरू झाला.

जगातील इतर देशांमध्ये हिजाबबाबत काय नियम आहेत? अनेक देशांमध्ये सार्वजनिक ठिकाणी हिजाब वापरावर बंदी घातली आहे. मराठी वेबसाईट लोकमतने या संदर्भात वृत दिले आहे. लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार खालील देशात हिजाबवर बंदी आहे.

डेन्मार्क (Denmark)
डेन्मार्कमध्ये हिजाब घालण्यास सक्त मनाई आहे. हिजाब घालणे किंवा चेहरा झाकणे याबाबत कडक कायदा आहे. पकडले गेल्यास 12 हजार ते 85 हजार रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो.

नेदरलँड (Nederland)
नेदरलँडमध्ये शाळा, रुग्णालये, सार्वजनिक वाहतूक आणि सरकारी भवनांमध्ये हिजाब किंवा चेहरा झाकण्यास बंदी आहे. त्यामुळे बंदी असतानाही कोणी आढळले तर दंड भरावा लागू शकतो.

फ्रान्स (France)
युरोपमध्ये फ्रान्सने सर्वात आधी 2004 मध्ये शाळांमध्ये हिजाबवर बंदी घातली. यानंतर फ्रान्स सरकारने 2011 मध्ये सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यावरही बंदी घातली होती. हिजाब परिधान करणाऱ्यांचे येथे स्वागत नाही, असे फ्रान्सच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्षांनी म्हटले होते.

बेल्जियम (Belgium)
बेल्जियममध्ये हिजाब घालण्याबाबत अनेक निर्बंध आहेत. येथे शाळा, रुग्णालये, सार्वजनिक वाहतूक आणि सरकारी इमारतींमध्ये हिजाब किंवा चेहरा झाकण्यावर बंदी आहे.

बल्गेरिया (Bulgaria)
दहशतवादी कारवाया पाहून बल्गेरियन सरकारने निर्णय घेतला होता की देशात हिजाब घालणे किंवा चेहरा झाकणे बेकायदेशीर आहे. बल्गेरियामध्ये सरकारने चेहरा झाकण्याबाबत कडक कायदे लागू केले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here