Hijab Controversy: हिजाब प्रकरण काँग्रेसच्या नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

0

दि.१३: Hijab Controversy: हिजाब (Hijab) वरून कर्नाटकात वाद सुरू आहे. कर्नाटक हिजाबचे पडसाद देशातील अनेक राज्यात उमटले आहेत. हिजाब वरून राजकीय पक्षांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. अनेक सत्ताधारी आणि विरोधी नेते यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत. यातच आता कर्नाटकमधीलकाँग्रेसचे नेते जमीर अहमद (Zameer Ahmed) यांनी आज एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. 

जमीर अहमद माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, इस्लाममध्ये हिजाब याचा अर्थ पडदा, असा आहे. हिजाबमुळे महिलांचे सौंदर्य दिसत नाही. तसेच महिलांनी हिजाब परिधान न केल्यास त्यांच्यावर बलात्कार होतो, असं वादग्रस्त विधान जमीर अहमद यांनी केलं आहे.  



भडकवण्याचा डाव

११ फेब्रुवारीच्या आयबी अलर्टनुसार पन्नूने भारतीय मुस्लिमांना भडकवण्याचा प्रयत्न केला आहे. हिजाबवर लावलेली बंदी उद्या अजान आणि कुराणवर लावली जाईल. त्यासाठी विरोध करण्याची वेळ आता आली आहे. भारताला उर्दुस्तान बनवा. मुस्लिमांचा वेगळा देश बनवलेल्या पाकिस्तानकडून शिका असं त्याने म्हटलं आहे. 

हिजाब वादाला चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणात फंडिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिक पोलीस आणि सर्व एजन्सीला अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. हिजाब रेफरेंडमसाठी एक वेबसाईट बनवण्यात आली आहे. त्यात लोकांना ऑनलाईन सपोर्ट करण्यासाठीही सांगितले जात आहे. या सर्व योजनेमागे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISI चा हात असल्याचं भारतीय गुप्तचर यंत्रणेने दावा केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here