देशातील या राज्यातील मुख्यमंत्र्याला जास्त मानधन, या राज्यातील मुख्यमंत्र्याला कमी

0

दि.17: भारतात एकूण 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. अनेकांना उत्सुकता असते की मुख्यमंत्र्यांना किती मानधन मिळते. राज्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांना मानधन असते. राजकारण्यांचा (Salary of Political Leaders) पगार (मानधन) जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. खासकरून प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा पगार किती आहे? कोणत्या राज्यातील मुख्यमंत्र्यांना (CM Salary) जास्त तर कमी पगार कुणाला मिळतो? असे सवालही तरुणांचा मनात असतात. याबाबत गुगल सर्च करून जाणून घेण्याचा देखील प्रयत्न केला जातो. दरम्यान मनीकंट्रोलने याबाबत वृत्त दिले आहे.

2022 मध्ये गोवा, मणिपूर, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका (Assembly elections 2022) होणार आहेत. अशा परिस्थितीत, निवडणुकीच्या वेळी, लोकांच्या मनात अनेकदा एक प्रश्न येतो की मुख्यमंत्र्यांचा पगार किती आहे? जाणून घ्या की तुमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा पगार किती आहे. तसंच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सर्वाधिक पगार आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 164 नुसार मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपालांकडून केली जाते. भारतात एकूण 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा पगार वेगवेगळा असते. मुख्यमंत्र्यांचा पगार दर दहा वर्षांनी वाढवला जातो.

सर्वसाधारणपणे लोकांचा असा विश्वास आहे की राष्ट्रपतींचा पगार सर्वाधिक असेल, त्यानंतर पंतप्रधानांचा पगार असेल. पण हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की, अशी काही राज्ये आहेत जिथे मुख्यमंत्र्यांचा पगार पंतप्रधानांच्या पगारापेक्षा जास्त आहे. मीडिया रिपोर्टनुसार, तेलंगणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा पगार भारतात सर्वाधिक आहे. यानंतर दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा पगार तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर चौथ्या क्रमांकावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (Maharashtra CM Salary) आहेत. दरम्यान त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांचा पगार सर्वात कमी आहे.

राज्य-मुख्यमंत्र्यांना मिळणारे मानधन

तेलंगणा-4,10,000 रुपये

दिल्ली -3,90,000 रुपये

उत्तर प्रदेश- 3,65,000 रुपये

महाराष्ट्र- 3,40,000 रुपये

आंध्र प्रदेश- 3,35,000 रुपये

गुजरात- 3,21,000 रुपये

हिमाचल प्रदेश- 310,000 रुपये

हरयाणा-2,88,000 रुपये

झारखंड- 2,55,000 रुपये

मध्यप्रदेश- 2,30,000 रुपये

छत्तीसगड-2,30,000 रुपये

पंजाब- 2,30,000 रुपये

गोवा-2,20,000 रुपये

बिहार- 2,15,000 रुपये

पश्चिम बंगाल- 2,10,000 रुपये

तमिळनाडू- 2,05,000 रुपये

कर्नाटक- 2,00,000 रुपये

सिक्किम- 1,90,000 रुपये

केरळ- 1,85,000 रुपये

राजस्थान- 1,75,000 रुपये

उत्तराखंड- 1,75,000 रुपये

ओडिशा- 1,60,000 रुपये

मेघालय-1,50,000 रुपये

अरुणाचल प्रदेश- 1,33,000 रुपये

आसाम- 1,25,000 रुपये

मणिपूर- 1,20,000 रुपये

नागालँड- 1,10,000 रुपये

त्रिपुरा- 1,05,500 रुपये


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here