High Blood pressure : रोज हा पदार्थ खाल्ल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो, संशोधनातून आली माहिती समोर

0

High Blood pressure वर नवीन संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नियमित दही खाल्ल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो

High Blood pressure : युनिव्हर्सिटी ऑफ साउथ ऑस्ट्रेलियाने (University of South Australia) केलेल्या अभ्यासानुसार, दररोज दह्याचे (Yoghurt) सेवन केल्याने लोकांना उच्च रक्तदाब (high blood pressure) नियंत्रित करण्यात मदत होऊ शकते. हे संशोधन ‘इंटरनॅशनल डेअरी जर्नल’मध्ये प्रसिद्ध झाले आहे.

मेन युनिव्हर्सिटीच्या (University of Maine) सहकार्याने आयोजित केलेल्या या अभ्यासात दही सेवन, रक्तदाब आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी जोखीम घटक यांच्यातील संबंध तपासले गेले, दही उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी कमी रक्तदाबाशी संबंधित असल्याचे आढळून आले.

हेही वाचा Sim Card : सिम कार्डबाबत DOT चा नवीन नियम देशात झाला लागू

जागतिक स्तरावर, एक अब्जाहून अधिक लोक उच्च रक्तदाब (High Blood Pressure) ग्रस्त आहेत, ज्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आणि स्ट्रोक यांसारख्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा (CVDs) धोका जास्त असतो.

CVDs (Cardiovascular Disease) (हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग) हे युनायटेड स्टेट्समध्ये जगभरातील मृत्यूचे प्रमुख कारण आहेत, प्रत्येक 36 सेकंदाला एक व्यक्ती CVD मुळे मरते; ऑस्ट्रेलियात, दर 12 मिनिटांनी.

डॉ. अलेक्झांड्रा (Dr Alexandra Wade) यांनी सांगितले, की दुग्धजन्य पदार्थ, विशेषत: दह्याच्या सेवनाने रक्तदाब कमी होतो. दुग्धजन्य पदार्थांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसह असे सूक्ष्म पोषक (Micronutrients) घटक असतात. यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. दह्यामध्ये बॅक्टेरिया असल्याने ते अधिक प्रभावी असते.

तब्बल 915 स्वयंसेवकांना या अभ्यासातील प्रयोगांसाठी सहभागी करून घेण्यात आलं होतं. नियमितपणे दही खाणाऱ्या लोकांचा रक्तदाब हा दही न खाणाऱ्या लोकांपेक्षा सुमारे 7 पॉईंटने कमी असल्याचे संशोधनातून दिसून आले. रिस्क फॅक्टर्स लोकांवर दह्याचे संभाव्य फायदे तपासण्यासाठी भविष्यात अधिक अभ्यास करणे गरजेचे असल्याचे संशोधकांनी म्हटलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here