Viral Video: पिल्यांच्या रक्षणासाठी कोंबडी विषारी नागाबरोबर लढली, व्हिडिओ व्हायरल

0

दि.29: Viral Video: नाग (Cobra) हा अतिशय धोकादायक प्राणी आहे, मग तो मोठा असो वा छोटा नाग (Cobra) नेहमीच धोकादायक असतो. आणि त्यांच्यापासून सुटणे कोणालाही अवघड आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. जे पाहून तुमच्या अंगावर शहारे येतील. हा व्हिडीओ कोब्रा आणि कोंबडी (Hen) यांच्यातील लढतीचा आहे, ज्यामध्ये कोण जिंकतो, हे तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यानंतरच कळेल. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, एक कोंबडी धोकादायक नागापासून स्वतःच्या अंड्यांना वाचवण्याचे धाडस कसे दाखवते ते तुम्ही पाहू शकता.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कोंबडी आपल्या अंड्यांवर बसली आहे, तेव्हाच एक काळा नाग कोंबडीच्या घरट्याजवळ पोहोचतो. विषारी कोब्रा कोंबडीसमोर बसतो. फणा काढून बसलेला कोब्रा कोंबडीवर हल्ला करतो, त्यानंतर कोंबडीही चोचीने हल्ला करू लागते. कोंबडी हार मानत नाही आणि कोब्रा निघून जाईपर्यंत चोचीने हल्ला करत राहते.

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक कोंबडीचे कौतुक करत आहेत आणि कोंबडीचे पिल्लांचे रक्षण केल्याबद्दल त्याचे कौतुक करत आहेत. हे पाहून काही लोकांना आश्चर्य वाटले असले तरी ते सांगतात की कोंबडी विषारी सापासमोर लढत राहिली जोपर्यंत साप त्याच्यापासून दूर जात नाही. एका यूजरने म्हटले की, ‘आम्ही कल्पनाही केली नव्हती, साप आणि कोंबडीमध्ये भांडण होऊ शकते.’ तर तुम्ही पाहिले की आई आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी कोणालाही घाबरत नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here