Helicopter Crashed in Arunachal Pradesh: भारतीय सैन्याचं हेलिकॉप्टर अरुणाचल प्रदेशमध्ये कोसळलं

0

दि.21: Helicopter Crashed in Arunachal Pradesh: अरुणाचल प्रदेशातील (Arunachal Pradesh) सियांग जिल्ह्यात (Siang District) भारतीय सैन्याच्या (Indian Army) हेलिकॉप्टरला अपघात (Helicopter Crashed) झाला असून हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती मिळाली आहे. भारतीय सैन्यातील ध्रुव हेलिकॉप्टर कोसळलं असून बचाव कार्यासाठी पथक रवाना झालं असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, अद्याप या अपघातात जखमींबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. अरुणाचल प्रदेशातील सियांग जिल्ह्यात तूतिंग भागात ही दुर्घटना घडली आहे.

ध्रुव हेलिकॉप्टर हे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडद्वारे विकसित आणि निर्मित भारतातील बहुउद्देशीय हेलिकॉप्टर आहे. हे भारतीय सशस्त्र दलांना पुरवलं जातं आणि नागरी आवृत्ती देखील उपलब्ध आहे. हे हेलिकॉप्टर सर्वात आधी नेपाळ आणि इस्रायलमध्ये निर्यात करण्यात आलं आणि नंतर लष्करी आणि व्यावसायिक वापरासाठी इतर अनेक देशांनी हे हेलिकॉप्टर आयात केलं. हे हेलिकॉप्टर लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर आहे. तसेच, ध्रुव हे लढाऊ हेलिकॉप्टर आहे.

दरम्यान, केदारनामध्ये मंगळवारी एक हेलिकॉप्टर कोसळले होते. या दु:खद बातमी आल्यानं संपूर्ण देश हळहळला. या हेलिकॉप्टर दुर्घटनेत पायलटसह सात जणांचा मृत्यू झाला. गरुडचट्टी जवळ हा अपघात झाला. केदारनाथ येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेतील मृतांमध्ये पाच महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. यातील तीन महिला गुजरातच्या होत्या.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here