महाराष्ट्रातील या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज

0

दि.19 : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस (Rain) आता पुन्हा जोरदार पुनरागमन करणार आहे. राज्यात पुढील चार दिवस जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील चार दिवस म्हणजेच 22 सप्टेंबरपर्यंत राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटसह पाऊस पडेल. तर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

19 सप्टेंबर

कोकण – बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

मध्य महाराष्ट्र – तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

मराठवाडा – तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

विदर्भ – बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

20 सप्टेंबर

कोकण – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.

मध्य महाराष्ट्र – काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.

मराठवाडा – काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

विदर्भ – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

21 सप्टेंबर

कोकण – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र – बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.

मराठवाडा – बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.

विदर्भ – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.

22 सप्टेंबर

कोकण – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.

मध्य महाराष्ट्र – बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.

मराठवाडा – बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.

विदर्भ – बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

पुणे आणि आसपासच्या परिसरासाठी हवामानाचा अंदाज

19 सप्टेंबर – आकाश अंशत: ढगाळ राहून दुपारी, संध्याकाळी आकाश सामान्यत: ढगाळ राङण्याची व हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता.

20 सप्टेंबर – आकाश सामान्यत: ढगाळ राहण्याची व हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता.

21 सप्टेंबर – आकाश सामान्यत: ढगाळ राहण्याची व हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता. घाट विभागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.

22 सप्टेंबर – आकाश सामान्यत: ढगाळ राहण्याची व हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता. घाट विभागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here