मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता

0

मुंबई,दि.27: मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मान्सूनने राज्यात जोरदार एंट्री केली आहे. आतापर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. उकाड्यामुळे वैतागलेल्या नागरिकांना सुखद धक्का दिला असून खोळंबलेल्या शेतीच्या कामांना वेग आला आहे.

मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता

राजधानी मुंबईत मान्सून एन्ट्रीलाच धो धो बरसला. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याचा प्रकार घडला. सोमवारी मुंबईतील किमान तापमान 26 तर कमाल 29 अंश सेल्सिअस होते. तर आज मंगळवारी मुंबईतील किमा तापमान 27 आणि किमान 28 अंश सेल्सिअस राहणार असल्याचा अंदाज आहे. तसेच मुंबईसह कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

गेल्या दोन तीन दिवसांत नागपुरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसाच्या एन्ट्रीमुळे तापमानात कमालीचा बदल जाणवत आहे. सोमवारी कमाल तापमान 33.7 तर किमान 22.8 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. आज नागपूरसह परिसरात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नागरिकांनी संभाव्य परिस्थिती लक्षात घेता योग्य ती काळजी घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कल्याण डोंबिवलीत काल 26 जून रोजी कमाल तापमान 29 तर किमान 26 अंश सेल्सिअस होते. आज सकाळपासून डोंबिवलीत पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. तर आज मंगळवारी कमाल तापमान 28 आणि किमान 26 राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच पावसाची शक्यताही वर्तवण्यात आलीय.

पुण्यामध्ये 26 जून रोजी कमाल तापमान 28 तर किमान 22.3 अंश सेल्सिअस असल्याची नोंद झाली आहे. उद्या 27 जून रोजी शहरातील कमाल तापमान 27 तर किमान 22 अंश सेल्सिअस असेल. आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता असून हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर घाट भागात तूरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.

छत्रपती संभाजीनगरमध्ये सोमवारी कमाल तापमान 32 तर किमान 23 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. आज मंगळवारी तापमान तेवढेच राहणार असल्याचा अंदाज आहे. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आजही वातावरण ढगाळ राहणार असून पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. 100 मिमी पाऊस पडल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असं कृषी खात्यानं सांगतिलंय.

कोल्हापूरसह जिल्हाभरात मान्सूनचे आगमन झाले आहे. सोमवारी धरण क्षेत्रात मुसळधार तर शहरी भागात तुरळक पाऊस झाला. आज मंगळवारीही आकाश ढगाळ राहणार असून पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. सोमवारी कमाल तापमान 30 तर किमान 23 अंश सेल्सिअस होते. आजही तापमान तेवढेच राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here